IMPIMP
The reading of the result by the Speaker of the Legislative Assembly began, the fear of Maharashtra increased The reading of the result by the Speaker of the Legislative Assembly began, the fear of Maharashtra increased

विधानसभा अध्यक्षांकडून निकाल वाचनास सुरुवात, महाराष्ट्राची धाकधूक वाढली

मुंबई : महाराष्ट्र शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधीमंडळाच्या सभागृहात पार पडत आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करीत आहेत. या सुनावणीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटातील नेते उपस्थित झाले आहेत. यासोबत शिंदे आणि ठाकरे गटातील वकिल देखील याचिकाच्या वेळी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात उपस्थितीत झाले आहेत.

हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर वकिल उज्ज्वल निकम यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले.. 

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुरू झालं आहे. सुरूवातीला नार्वेकरांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचं तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. घटना नेतृत्व आणि विधीमंडळ बहुमत पक्ष ठरवतांना काही घटक महत्वाचे आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची ? याबाबत माझ्यासमोर महत्वाचा मुद्दा राहिला आहे. असे राहुल नार्वेकरांनी म्हटलंय.

निकालाची पत्र सगळ्यांना देण्यात येणार आहे. तसेच राजकीय पक्ष मी प्रथमदर्शनी ठरवणार आहे. निवडणुक आयोगाचा निकाल, घटना लक्षात घेऊन निकाल देणार आहे. विधीमंडळातील बहुमत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. खरी शिवसेना कोणची माझ्या समोरचा मुद्दा आहे.  खरी शिवसेना कोणती आणि व्हीप कोण? हा माझ्यासमोरचा मुद्दा आहे. असे राहुल नार्वेकरांनी सांगितले आहे.

हेही वाचा…मुंबईत ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार, पक्षाला बसला मोठा हादरा 

आमदार अपात्रता निकाल वाचनासाठी विधीमंडळाच्या सभागृहात शिंदे गटाचे आमदार उपस्थित आहेत. शिंदे गटाकडून आतापर्यंत बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगूले, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, मधल्या रांगेत बसले आहेत. तर शेवटच्या बाकावर मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे सभागृहात एकत्रित बसले आहेत. तर ठाकरे गटाकडून सुनील प्रभू, अंबादास दानवे, वैभव नाईक, सुनील शिंदे हे उजव्या बाजूच्या रांगेत बसले आहेत.

READ ALSO :

हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र निकाल, विधीमंडळात शिंदे अन् ठाकरे गटाचे कोण कोणते आमदार उपस्थित ? 

हेही वाचा…निकालाची दुसरी बाजू, तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लॅन बी काय ? 

हेही वाचा…निकाल आधीच ठरलाय..! राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका 

हेही वाचा…“खासदार हेमंत पाटलांचं बळ वाढलं,” मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत जाहीर सभा

हेही वाचा…राहुल नार्वेकर कोणत्या गटाच्या आमदारांचा गेम करणार? वाचा संपुर्ण यादी