जालना : मी गद्दार नाही. पाठीत खंजीर खुपसत नाही. देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाहीत. सगेसोयरे यांची अंमलबजावणी करावी. ते त्या पदावर नसते तर आम्ही त्यांना कशाला बोललो असतो ? असा सवाल आता मनोज जरांगे पाटलांनी केलाय. तसेच अख्खा राज्यातून मराठा समाजाची फसवणूक कुणी कुणी केली ? त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. सामुहिक कट रचून आमची फसवणूक केली असे गुन्हे आम्ही सरकारवर दाखल करू असा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवरून भाजप अन् शिंदेंचे नेते भिडले, महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की , मी शेतकऱ्याचं पोरगं, ग्रामीण भागात राहिलोय. माझी भाषा तशीच आहे. फडणवीस आणि माझं शत्रत्व नाही. मी कुणाला घाबरत नाही. जेलला टाका, नाही तर कुठेही टाका. माघारी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन. संधी हातातून गेलेली नाहीय. सरकारच्या अंगात मोठेपण हवे. सगेसोयरेची अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा…जरांगे पाटील जालन्यातून लोकसभेचे उमेदवार, वंचितने आघाडीसमोर ठेवला ‘या’ २७ जागांचा प्रस्ताव
दरम्यान, मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेन, ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील. मी दोषी नाही. मी समाजासाठी लढतोय? उभं आयुष्यपणाला लावलंय. ५७ लाख नोंदींच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना आरक्षण मिळालं असेल. उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय. कुठलीही यंत्रणा वापरा. काहीही झालं तरी मी हटत नाही. सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात. आम्हाला कायदे कळत नाही का ? असाही सवाल केलाय. तसेच संचारबंदी कधी लावावी लागते? हे कळते. रात्रीच्या कारवाया सुरू आहेत. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदाराच्या मुलीची युवासेनेत एंन्ट्री, ठाकरे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर
हेही वाचा……दादा स्विकारणार का शरद पवारांचं निमंत्रण ? नमो महारोजगार मेळाव्यावरून रंगणार मानापमान नाट्य
हेही वाचा“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा!” सभागृहात वडेट्टीवार सरकारवर संतापले
हेही वाचा…ठाण्यात दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये लोकसभेची लढाई ? महायुतीचा उमेदवार ठरला ?
हेही वाचा…महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरे, शरद पवार, कॉंग्रेस किती जागा लढवणार ?