मुंबई : गेल्या दोन वर्षात राज्याने गुंतवणुकीमध्ये पहिला क्रमांक गमावला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेले. तेथील तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणुक या काळात 23 अब्ज डॉलर्सवर गेली. महाराष्ट्र मात्र 18 अब्ज डॉलर्सवर घसरला. केवळ गुजरातविरोधात भाषणे देऊन चालत नाही. आपल्या राज्यासाठी चांगल्या योजना आखाव्या लागतात. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, तो आपला लहान भाऊच आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीने फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगात यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला हाणला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, गुजरात आपला लहान भाऊ आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहे तर ते ठिक आहे. मग यंदाच्या भाऊबीजेला भावाला ओवाळून या, बघा ओवाळणीत वेदांताचा प्रकल्प परत मिळतोय का? असा खोचक सवाल त्यांनी केला.
“आता बाळासाहेब हयात असते तर शिंदेंची बिन पाण्याने केली असती”; अजित पवारांची टोलेबाजी
तसेच पांढऱ्या पावलांच सरकार आल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याची प्रखर टिका शिवसेनेच्या नेत्या मनिषा कांयदे यांनी केली आहे. वेदांता फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? 10 टक्के नुसारच हिशोब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है..! चौकशी झाली पाहिजे, असं देखील आशिष शेलारांना म्हटलं आहे.
“आता मुख्यमंत्र्यांचा आवाज BJP अन् ED ने म्युट केलाय”; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
दरम्यान, तसेच जनतेसमोर सत्य यायलायच हवे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10 टक्के लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता. असा गोप्सस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी देखील केला आहे.
Read also
- “पांढऱ्या पावलांच सरकार आलं अन् प्रकल्प गुजरातला गेला”; मनिषा कांयदे
- “वेदांता प्रकल्पासाठी BMC ने किती रेटने मागणी केली होती”; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- “बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यास धाडस लागतं”; उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
- “भाजपने मुंबई महापालिकेत उपमहापौर पद द्यावं”; रामदास आठवलेंची आता नवी मागणी
- “मंत्र्यांनी बंगले घेतले, पद घेतली, पण महाराष्ट्रात पालकमंत्री कुठं आहेत”? आदित्य ठाकरेंचा सवाल