मुंबई : पोलिस सुरक्षामध्ये नवाब मलिक यांना फक्त एक तासासाठी सोडण्याची विनंती न्यायालयात मलिक यांच्या वतीने अमित देसाई यांनी केली. मात्र त्यावर न्यायालयाने कोणतीही पुर्तता केली नाही. आम्ही जामीन मिळवण्यासाठी आलेलो नाही तर याचिकाकर्त्याला मतदानासाठी फक्त एक तासांसाठी सोडण्यात यावे, यासाठी आलो आहे, असं त्यांनी म्हटलं. परंतु न्यायालयातील न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्याकडून अजूनही त्यावर निर्णय दिला नसल्याने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना याचिकेच दुरूस्ती करून योग्य त्या न्यायालयात जाण्याची मुभा दिली गेली आहे.
“उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक”
राज्य घटनेच्या कलम 226 नुसार उच्च न्यायालयाला तशा प्रकारे विशेष अधिकारात तसा आदेश देता येतो. उच्च न्यायालयात अपवादातम्क स्थितीत आणि विशेषाधिकारात जामीन देण्याचाही अधिकार आहे, मात्र आम्ही जामीन मागत नसून लोकप्रतिनिधी म्हणून मतदान करण्याच्या असलेला घटनात्मक हक्क आणि माझ्या कर्तव्याच पुर्तता या कारणासाठी उच्च न्यायालयात आलो आहेत. असा युक्तिवाद मलिक यांच्यावतीन अमित देसाई यांनी केला.
इडीने केला आघाडीचा घात; निवडणुकीसाठी नवाब-देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
राज्यसभा निवडणुक ही राजकीय प्रक्रिया असून आमच्या मतदारसंघाटे प्रतिनिधित्व म्हणून मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी न्यायालयाने आपल्या विशेषाधिकारांतर्गत काही तासांसाठी विधानभवनात पोलीस सुरक्षेत जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मलिक आणि देशमुख यांनी पीएमएलए न्यायालयात अर्जांद्वार केली होती. मात्र लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 62 (5) नुसार शिक्षा भोगत असलेला कैदी किंवा कायदेशीर कोठडींतर्गत तुरूंगात असलेला कैदी यांना कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क नाही, असा युक्तीवाद मांडत इडीने विरोध केला होता.
पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, याचा परिणाम होईल; छगन भुजबळ यांचं सुचक वक्तव्य
राज्यसभेच्या एकुण ६ जागांसाठी विधिमंडळात मतदान सुरू झालं आहे. त्याचा निकाल आज सायंकाळी लागणार असून सकाळी ९ वाजता सुरू झाल्यानंतर गेल्या दोन तासात 190 आमदारांनी मतदान केलं आहे. इंदापुरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वप्रथम मतदान करून राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात केली.
Read also:
- “निजामाची औलाद एमआयएमची मदत घेऊन शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघड पडलं”
- एक मत लाखो मोलाचं; भाजपच्या आमदार मतदानासाठी स्ट्रेचरवरून विधिमंडळात दाखल
- राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू; दीड तासात 143 आमदारांनी केलं मतदान
- व्हिलचेअरवरून भाजपचे दोन आमदार विधानभवनात येणार ; राजकीय घडामोडींना वेग
- “न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गालावर बारावी थप्पट मारली”; जामीन अर्ज फेटाळ्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया