मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली असून वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकरी आंदोलनाला वर्ष होण्याआधी मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला आहे. मात्र असं असलं तरी दुसरीकडे मोदी सरकारच्या या निर्णयावर टीकाही करण्यात येत आहे.
कृषी कायदे मागे घेतले, आता तुम्ही ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा; दरेकरांच सरकारला साकडं
कृषी कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र हे कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. दुसरे असे की याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची याचिका आहे. आमची विनंती आहे की ‘कृषी’ हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा आहे या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोणते कृषी कायदे वादग्रस्त?
1 कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
2 हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020
3 जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020
Read Also :
- “कृषी कायदे मागे घेतले त्याप्रमाणेच एकदिवस ED, CBI चा गैरवापर केंद्राने थांबवावा”
- एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार ही तर एक अफवा – माजी मंत्री सदाभाऊ खोत
- सात वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारनं पाय मागे घेतलाय; नवाब मलिकांची संतप्त प्रतिक्रिया
- मोदी सरकार देर आये, दुरुस्त आये; शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय – अमोल कोल्हे
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; वादग्रस्त तीनही कृषी कायदे रद्द