मुंबई : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. यातच आता ठाकरे गटातील नेत्यांचं शिष्ठमंडळ राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
हेही वाचा…“आता पंतप्रधानांना संबोधित करताना प्राईम मिनिस्टर ऑफ बीजेपी असं म्हणायचं का ?” बड्या खासदाराचा सवाल
जालन्यात खोके सरकारने केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली. मिंधे-भाजप सरकारमध्ये जनरल डायर कोण आहे, हे जनतेला कळलेच पाहिजे. चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल पण जनरल डायरचं काय? घटनाबाह्य सीएमने आदेश दिले की डीसीएमने, हे लोकांसमोर आलेच पाहिजे. खरे तर अशा लाठीचार्ज नंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तरी देखील राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून ह्या प्रश्नांबाबत कडक शब्दांत समज दिली पाहिजे, अशी मागणी केली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा…अबब..! इंडिया नाव भारत करण्यासाठी ‘इतके’ कोटी खर्च होणार, आकडा ऐकून थक्क व्हाल
दरम्यान, या प्रकरणावरून लाठीचार्जचा आदेश देण्याचा अधिकार मला नसून तेथील एसपीला आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर मी जर आदेश दिले असतील, हे विरोधकांनी सिद्ध केले तर राजकारण सोडून देईन, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. तर या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माफी मागितली आहे.
जालन्यात खोके सरकारने केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली.
मिंधे-भाजप सरकारमध्ये जनरल डायर कोण आहे, हे जनतेला कळलेच पाहिजे. चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल पण जनरल… pic.twitter.com/4o1m6mAZmT
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…काहीही करून मुख्यमंत्र्यांच्या मुलाला घरी बसवायचंय, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना, मोठी रणनीति तयार
हेही वाचा…“जालन्यात मुख्यमंत्र्यांनी उपोषण करायला सांगितले, तर लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिलेत”
हेही वाचा…सभागृहात पेन ड्राईव्ह दिला, ‘त्या’ प्रकरणात संपादकांवर गुन्हा दाखल, पण सोमय्यांवर का नाही ?
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी खूशखबर.., कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत
हेही वाचा…लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण ? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल