मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक जण पक्ष प्रवेश करीत आहेत. यातच ठाकरे गटाचे मुंबईतील विक्रोळी विभागातील कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक आणि राऊत बंधूंचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच जिंकून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…ठाकरेंचा मुंबईतील एक शिलेदार अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
निवडणूक घेण्याची हिंमत नसल्याचा आरोप आमच्यावर केला जातो आहे, मात्र उबाठा गटाने वॉर्ड रचनेबाबत केलेली याचिका सर्वाच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक घ्यायला विलंब लागत आहे. उलट कधीही निवडणुका लागल्या तर त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. विरोधकांनी एकत्र येऊन २०१४ आणि २०१९ साली आघाडी केली होती. मात्र तरीही त्यांना नरेंद्र मोदी यांना हरवणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी दिसतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, जाहिरात करत आहे, जनता मंत्रालयात मात्र..,” राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
दरम्यान, शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या आता ३३ झाली असून त्यातील २५ हे उबाठा गटाचे असल्याचे सांगितले. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्याच लोकांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे यासमयी स्पष्ट केले.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! “ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराला पक्षात येण्यासाठी १०० कोटींची ऑफर” ,?
हेही वाचा…दोन्ही उपमुख्यमंत्री अन् मुख्यमंत्र्यामध्ये भांडण, सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का ? वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…“मोदींनी निवडणुकीपुर्वी पहिला धक्का, ‘रासप’ एनडीएतून बाहेर, जानकरांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार”
हेही वाचा…“56 इंचाची छाती असलेले पंतप्रधानांना चीन घाबरत नाही का?” वडेट्टीवारांचा मोदींना सवाल, चीनचा विषय तापला
हेही वाचा…“वडेट्टीवारांची काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत मोठी बैठक, राजकीय हालचाली सुरूय”