पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपुरला लागलेला कलंक असल्याची टिका केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून टिका करण्यात येत आहे. काल भाजपचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा आक्षेपार्ह फोटो ट्विट केल्याने तृतीय पंथीयांनी नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुण्यात नितेश राणे यांच्याविरोधात तृतीय पंथीय संघर्ष समितीने आंदोलन देखील करण्यात आले.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी तर उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा”,भाजप नेत्याची जहरी टिका
कलंक केलेल्या टिकेनंतर नितेश राणे यांनी ट्विटवर उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टिका केली. मर्दानगीवर कलंक, हिजड्यांच्या प्रमुखांकडून अजून काय अपेक्षा, बायला कुठला असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरेंवर टिका केली. याविरोधात तृतीय पंथीय समाजाचा अपमान केल्यामुळे नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत बंड गार्डनसमोर तृतीय पंथीयांनी आंदोलन केले.
हेही वाचा…कामाला लागा..! सर्वात जास्त जागा निवडून येतील, काॅंग्रेसला महाराष्ट्राकडून अपेक्षा, वरिष्ठ नेत्यांचे आदेश
या दरम्यान, भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्रान्सजेंटर अक्टनुसार त्यांनी तृतीय पंथीयाचा अपमान केला आहे. त्यांच्यावर १५३ अतंर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही बंडगार्डन पोलीस स्टेशनकडे केली आहे. जर पोलीस स्टेशनकडून यावर कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावू, अशी भूमिका तृतीय पंथीय समाजाने घेतली आहे.
मर्दानगी वर कलंक !
हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा..
बायला कुठला!! pic.twitter.com/5Wl37OeS8e
— nitesh rane (@NiteshNRane) July 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू, नव्या आमदारांना संधी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला”
हेही वाचा…काॅंग्रेसची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरली..! दिल्लीत काॅंग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय
हेही वाचा…अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादीने दिली जबाबदारी, अजित पवार गटाच्याविरोधात मोठी रणनीती
हेही वाचा…अजित पवार यांच्याकडील अर्थखातं बरोबर राष्ट्रवादीला मिळणार ‘ही’ खाती
हेही वाचा…“राष्ट्रवादीला १०० कोटी देत असतील तर आम्हाला २०० कोटी रूपये द्या,” मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाची तक्रार