मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे सरकारमधील मंत्र्यांची संख्या २९ झाली आहे. तर अजून १४ राज्यमंत्रीपद रिक्त आहेत. यातच राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात अद्याप आलेलं नाही. यातच आता राष्ट्रवादीच्या खातेवाटपाची संभाव्य यादी समोर आली आहे.
हेही वाचा…“तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील,” भाजपच्या बड्या नेत्याच विधान
अजित पवार यांच्याकडे अर्थखातं तर हसन मुश्रीफांकडे ग्रामविकास खातं, धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग, छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, देण्यात येण्याची शक्यता आहे.याचसोबत महिला व बालकल्याम विभाग, पर्यटन विभाग, क्रिडा विभाग, औषध प्रशासन विभाग या खात्यांचा देखील राष्ट्रवादीच्या आमदारांना देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर बावनकुळेंनी उत्तर द्यावे,” अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार
दरम्यान, अजित पवार यांना अर्थखात देऊ नये, अशी शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे. तर मंत्रिमंडळातील ८ मंत्रीपदं हे शिंदे गटाला मिळणार असल्याचा दावा आमदार भरतशेठ गोगावले यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीला १०० कोटी देत असतील तर आम्हाला २०० कोटी रूपये द्या,” मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाची तक्रार
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी तर उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा”,भाजप नेत्याची जहरी टिका
हेही वाचा…कामाला लागा..! सर्वात जास्त जागा निवडून येतील, काॅंग्रेसला महाराष्ट्राकडून अपेक्षा, वरिष्ठ नेत्यांचे आदेश
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सध्या मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज”, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…शरद पवार गटाने बाहेर काढलं, अजित पवार गटाने जवळ घेतलं, राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या नियुक्त्या