मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. एकीकडे याप्रकरणी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते हे या प्रकरणी NCB सह भाजपवर टीका करत होते. तर भाजपकडून देखील याप्रकरणातील आरोपींवर निशाणा साधला जात होता. अशावेळी आता मात्र, अचानक भाजप नेत्याने थेट आर्यन खानची बाजू घेत त्याला जामीन मिळावा अशी मागणी केली आहे.
पुण्यात 2022ला आरपीआय’चा महापौर होणार, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलायं – रामदास आठवले
क्रूझ ड्रग्स प्रकरणात राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी आता मात्र आर्यन खानला जामीन मिळालाच पाहिजे असं मत मांडलं आहे. ‘प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एक व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही. अखंड मानव जातीच्या ड्रग्सविरोधी ही लढाई आहे.
व्हायरलं ऑडिओ क्लिप प्रकरण पडलं महागात; शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता होणार कट?
‘आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत, गरीब, नेता किंवा अभिनेता हे सर्व कायद्याच्यासमोर समान आहेत. भविष्यात आर्यन ज्या ड्रग्स प्रकरणामुळे बदनाम झाला. त्याच ड्रग्सच्या विरोधात त्याने प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्सपासून दूर करण्यासाठी काम करुन संकटाचे संधीत रूपांतर करावे यासाठी एक देशवासिय या नात्याने शुभेच्छा.’ अशा शब्दात राम कदम यांनी आर्यन खानसाठी बॅटिंग केली आहे. दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी अचानक बदलेल्या या भूमिकेमुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रार्थना हैं की आज #आर्यनखान को जमानत मिल जाए. #संविधान तथा कानून के तेहत #ज़मानत मिलना एक मूलभूत अधिकार है. यह किसी एक व्यक्ति विशेष के विरोध की लड़ाई नहीं बल्कि समूचे मानव जाती की ड्रग्स विरोधी जंग है. उम्मीद थी #महाराष्ट्रसरकार कम से कम इस खतरनाक मामले में #ड्रग्समाफिया
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) October 20, 2021
दुसरीकडे आर्यन खान याला आज जामीन मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. कारण 14 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने आर्यनसह इतर आरोपींचा जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. यावेळी कोर्टाने असं म्हटलं होतं की, शक्य झाल्यास आम्ही 20 तारखेला निर्णय जाहीर करु. परंतु सध्या तरी आम्ही कामकाजात फार व्यस्त आहोत. मात्र, तरीही या प्रकरणी आम्ही 20 तारखेलाच निर्णय देण्याचा संपूर्ण प्रयत्न करु. यामुळे आता आर्यन खानला आज तरी जामीन मिळणार की नाही याकडेच त्याच्या कुटुंबीयांचे डोळे लागून राहिले आहेत. दरम्यान, यावेळी कोर्ट नेमकं काय निर्णय देतं त्यावर NCB काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Also :
- गायब झालेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक होणार? शोधासाठी तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय
- देगलुरमध्ये भाजप उमेदवाराला निवडुण द्या, मी गाव जेवण देतो – चंद्रकांत पाटलांची ऑफर
- महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
- काँग्रेसमध्ये नाराजी: सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा, अतुल लोंढेंची मुख्य प्रवक्तेपदी निवड
- मतदार याद्यांमधून मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत; मंत्री जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट