पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 45 मतदार संघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरूर असे 2 मतदारसंघ निश्चित केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका लावण्यात आला असून भाजपच्या मिशन शिरूरला शिंदे गटाचे बळ मिळत असल्याची चर्चा आहे.
राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय..! बच्चू कडूंची 25 वर्षाच्या मागणीला यश
गेल्या अडीच वर्षात शिरूरमध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विकासकामांत डावलल्यचा आरोप सातत्याने होत होता. राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना डावलून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली विकासकामे केंद्र , राज्य सरकार आणि डीपीसी च्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहेत. त्यामुळे बारामती जिंकण्यासाठी आणि शिरूर मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपला बळ मिळत आहे. पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती. मावळ आणि शिरूर असे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत.
जितेंद्र आव्हाडांना काही तासातच जामीन मंजूर..! राष्ट्रवादीचा मोठा जल्लोष
यातच शिरूर मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना आगामी निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यांना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा सामना करावा लागणार आहे. मात्र यातच राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना अमोल कोल्हे यांची अनुपस्थिती राहिली आहे. तसेच मध्यंतरी ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या. त्यामुळे या मतदार संघावर भाजपचे देखील मोठे लक्ष्य राहणार आहे.
राजकारण पुन्हा तापलं…! जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!
तसेच बारामती लोकसभा मतदार संघावर खासदार सुप्रिया सुळे यांची मजबुत पकड आहे. त्यामुळेच भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अलिकडेच त्यांनी बारामतीचा दौरा केला होता. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे देखील 48 जागांपैकी 45 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत बघायला मिळणार आहे.
Read also
- “लोकशाहीचा खून करणारा इडी सरकार”; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटलांचा हल्लाबोल
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
- मोठी बातमी…! जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली
- राज्य सरकारचे आणखी एक अपयश..! सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र