मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप आणि ठाकरे गटात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहेत. यातच आज सायंकाळी ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील मोर्चेंचे आयोजन करण्यात आले होते. मात्र समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघात २५ जणांचा मृत्यू झाल्याने भाजपने हा मोर्चा मागे घेतला आहे.
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा, राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत
शिवसेनेचा आज मुंबई महानगरपालिकेवर पुर्ण ताकतीने मोर्चा निघणार आहे. जेव्हापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आली आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधींना येऊ दिलं जात नाही. हे संपुर्ण प्रशासनाच्या माध्यमातून मंत्रालय आणि सध्याच्या वर्षा बंगला लुट सुरू आहे. महानगरपालिकेची या मोर्चाचे नेतृत्व युवा सेना प्रमुख शिवसेनेचे तरूण नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे. आज शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे.
हेही वाचा…“साहेबांचं राहिलं स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आपली, ” विनायक मेटेंच्या पत्नीची फडणवीसांसमोरच मागणी
दरम्यान, बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा.डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना! स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहचत आहेत. या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे “आक्रोश आंदोलन” आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू! असं भाजपने म्हटलं आहे.
बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण
महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
दु:खाचा.डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना!स्वतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
तर मा.…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? गेल्या अनेक महिन्यांपासून निष्पाप लोकांचा गेला जीव
हेही वाचा…आम्ही शिवबाचे मावळे..! मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांचे AI मधील फोटो व्हायरल
हेही वाचा“मुंबईतील मोर्चांने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यातील बुबळे बाहेर येतील”, राऊतांचा भाजपवर पलटवार
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, शरद पवारांकडून वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित
हेही वाचा…“पंकजा ताई स्वत: च्याच स्वार्थी राजकारणासाठी…..,”मराठा समाजाने पंकजा मुंडेंवर केली पहिल्यांदाच टिका