IMPIMP
Traitors have started to sit on each other's necks, discord in the grand alliance, strong criticism of the Thackeray group Traitors have started to sit on each other's necks, discord in the grand alliance, strong criticism of the Thackeray group

“एक दुसऱ्याच्या मानेवर बसण्याची गद्दारांची सुरूवात झालीय”, जागावाटपावरून महायुतीत कलह, ठाकरे गटाची जोरदार टिका

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असून मंत्री रविंद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर दावा सांगितला जात आहे. शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात आता ही जागा नेमकी कुणाला जाणार ? याचा उत्सुकता लागून राहिलीय असतांना विद्यमान खासदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी जोरदार टिका केली आहे.

हेही वाचा…राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार 

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. यावरून आता गद्दार हे एक दुसऱ्याच्या मानेवरती बसणाच आहे. पण त्याचीही सुरूवात झालेली आहे. अशी टिका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच महाविकास आघाडीकडून जो उमेदवार असेल तो आम्ही अडीच लाख मताच्या फरकाने निवडून आणू हा माझा शब्द आहे. असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं 

अलिकडेच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मोठी रणनिती आखली आहे. यातच राज्यातील काही मंत्र्यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे  रविंद्र चव्हाण यांना तयारी करण्याचे आदेश भाजपच्या वरिष्ठाने दिले असल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत असून सध्या ते ठाकरे गटात आहेत. तर दुसऱ्या बाजूला ही जागा महायुतीतून आम्हालाच मिळावी, अशी मागणी शिंदे गटाने केलीय. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळून, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी रत्नागिरी उदय सामंत, कणकवली नितेश राणे, राजापूर राजन साळवी, कुडाळ वैभव नाईक, कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम, सावंतवाडीतून दिपक केसरकर आमदार आहेत.

READ ALSO :

हेही वाचा…“त्या” किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं”, जरांगे पाटलांनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी 

हेही वाचा..“दादांसोबत नाही म्हणून आता सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकावा लागतोय”, रूपाली चाकणकरांनी सुळेंना डिवचलं 

हेही वाचालहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय भव्य भजन स्पर्धा ; पुणेकरांना अनुभवायला मिळणार ‘याची देही याची डोळा’ 

हेही वाचा…हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा.! IIT BHU मधील सामूहिक ब’ला’त्का’र प्रकरण, तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य 

हेही वाचा.रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवर भाजपचा डोळा ; भाजप ‘या’ कॅबिनेट मंत्र्याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत