रायगड : निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिल्यानंतर आज शरद पवार गटाकडून रायगडावर या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. यातच जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून दाखवली तर मी त्यांना एक लाखांचं बक्षिस देणार असं आवाहन अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यानंतर रायगड किल्ल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून मिटकरी यांनी दिलेलं आवाहन पुर्ण केलं आहे.
हेही वाचा…“आमदार आहेस, लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस, बाजारू विचारवंत,” पवार गटाने मिटकरींची बोलतीच केली बंद
आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हांचं अनावरण रायगडावर करण्यात आलं. तर तुतारी वाजवून मिटकरींचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी पुर्ण केले. मात्र आव्हाड यांनी एकट्याने तुतारी वाजवावी. तसेच मी पराभूत झाल्यास एक लाखाचं चेक तयार आहे. असं मिटकरी यांनी म्हटले आहे. परंतु चेक लिहितांना काही तपशील अमोल मिटकरी यांनी चुकवल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…
जितेंद्र आव्हाड यांनी माझं चॅलेंज स्विकारलं असेल तर मी देखील माझ्या उत्तारसाठी तयार आहे. एक लाख रूपयाचा चेक त्यांच्या नावाने तयार आहे. २६ तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्या दिवशी स्वत: त्यांनी तुतारी आणावी पत्रकारांसोबत आव्हाडांनी तुतारी वाजवावी, पन्नास हजारांवर अजितदादांनी आव्हाड वारंवार सांगत आहेत. त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा. असा टोलाही मिटकरी यांनी लगावला आहे.
रायगडावर एकटेच पोहोचलेत. बाकीचे कालवा बैठकीत दादांकडे पुण्यात रेंगाळलेत. आपण दिलेलं चॅलेंज या महोदयांनी स्वीकारलं. मात्र कार्यक्रमानंतर एकट्याने वाजवावी आणि एकट्यानेच आवाज तुतारीतुन काढावा हे चॅलेंज होतं. हे एकटे आले पण बाकी कुठे आहेत? #सावधान 😄 pic.twitter.com/HpSoChcxbw
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“नांदेडमध्ये ‘कॉंग्रेसचा बुरूज’ ढासळला,” अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
हेही वाचा…“ते काय हळदीकुंकू आहे का, भांडण झालं म्हणून जायचं नाही ?”सुळेंवर टिका करणाऱ्या चाकणकरांची हवाच काढली
हेही वाचा…“तुतारी एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा”, शरद पवारांनी रायगडावरून शड्डू ठोकला