पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता दोन्ही गटांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. यातच विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पडलेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी देखील हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून आता अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार टोला लगावला आहे.
हेही वाचा…“मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अन् मगच…”राज्याच्या मंत्र्याने इंडिया आघाडीला दिलं आव्हान
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कालवा सल्लागार समितीची पाणीविषयक बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीसाठी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली तर बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यातील यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यांची नितांत गजर आहे. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो तुमचे आमच्या दादांशिवाय पान हालत नाही. कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील, असा टोला चाकणकरांनी सुळेंना लगावला.
हेही वाचा…जरांगेंवर गंभीर आरोप, मराठा समाज आक्रमक, अजय बारस्कर महाराजांवर हल्ला
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नावानं असणाऱ्या पेजवरून रूपाली चाकणकर यांना जोरदार टोला लगावण्यात आला आहे. ताई आपण कधी ग्रामपंचायतीत निवडून गेला असता तरी आपल्याला कळलं असतं की प्रत्येक लोकप्रतिनिधीला अशा बैठकांना जावं लागतंय. असं म्हणत ते काय हळदीकुंकू आहे का ? भांडण झालं म्हणून जायचं नाही. ? असं म्हणज चाकणकरांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
ताई आपण कधी ग्रामपंचायतीत निवडून गेला असता तरी आपल्याला कळलं असतं की प्रत्येक लोकप्रतिनिधीला अशा बैठकांना जावं लागतंय…
ते काय हळदीकुंकू आहे का भांडण झालं म्हणून जायचं नाही ? https://t.co/ILDfyQeuwA— महाविकास आघाडी Official (@MahavikasAghad3) February 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“तुतारी एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा”, शरद पवारांनी रायगडावरून शड्डू ठोकला
हेही वाचा…“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा.“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“आमदार आहेस, लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस, बाजारू विचारवंत,” पवार गटाने मिटकरींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…“कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील”, चाकणकरांनी पुन्हा सुळेंना डिवचलं