रायगड : निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार नाव तसेच तुतारी हे निवडणुक चिन्ह दिल्यानंतर आज रायगडावर याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी देशातील विविध प्रश्नांच्या विरोधात एकजुटीने लढण्याबाबत आपले मत व्यक्त केले.
हेही वाचा…जरांगेंवर गंभीर आरोप, मराठा समाज आक्रमक, अजय बारस्कर महाराजांवर हल्ला
ही तुतारी एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा आहे. शिवछत्रपतीचं राज्य जिथून चाललं आहे. तिथे आपण आज आलो आहोत. छत्रपतींचा आदर्श नजरेसमोर ठेऊन राज्य उभं करू, जनतेची सेवा करू. कष्ट शौर्य व त्यागातून आपल्याला यश मिळेल अशा भावना यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा..राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, भाजपने नार्वेकरांसाठी निश्चित केला ‘हा’ मतदारसंघ
तर आपल्याला अनेकदा नियती संकेत देत असते. त्यापद्धतीने चिन्ह मिळणे हे संकेत समजले तरी वावगे ठरणार नाही. तुतारीला महाराष्ट्रातील जनमानसाच्या काळजात अत्यंत आदराचं व अभिमानाचं स्थान आहे. त्यामुळे हे चिन्ह घराघरात पोहचवणे अवघड नाही. असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जो जाज्वल्य इतिहास आहे. या इतिहासाशी तुतारी कनेक्टेड आहे. शेतकऱ्यांचा, युवाकांचा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा, महिलांचा आवाज आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान या तुतारीच्या ललकारातून दिसेल. असेही कोल्हे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा.“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“आमदार आहेस, लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस, बाजारू विचारवंत,” पवार गटाने मिटकरींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…“कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील”, चाकणकरांनी पुन्हा सुळेंना डिवचलं
हेही वाचा…“मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अन् मगच…”राज्याच्या मंत्र्याने इंडिया आघाडीला दिलं आव्हान