वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती निवडणुकीत झालेला पराभव मान्य नसल्याने त्यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेत घुसून तोडफोड केली होती. या हिंसाचाराला डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटने देखील खतपाणी घातले होते.
निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले व त्यांनी धुडगूस घातला. याबाबत ट्रम्प यांनी केलेले ट्विट ट्विटरकडून त्वरित हटविण्यात आले होते.
After close review of recent Tweets from the @realDonaldTrump account and the context around them we have permanently suspended the account due to the risk of further incitement of violence.https://t.co/CBpE1I6j8Y
— Twitter Safety (@TwitterSafety) January 8, 2021
आता ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही कालावधीत केलेले ट्विट आणि त्यांच्या संदर्भाची समीक्षा केल्यानंतर, यामुळे आणखी हिंसा भडकण्याची शक्यता असल्याने त्यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला होता. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Also :
- भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
- मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात ? राज्य सरकारचे संकेत
- धक्कादायक! भंडाऱ्यात सरकारी रुग्णालयात आग लागल्याने 10 बाळांचा मृत्यू
- ‘अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान’
- ‘बाळासाहेब म्हणायचे आम्ही औरंग्याची नाही, संभाजी महाराजांची औलाद आहोत’
- ‘त्या’ घटनेबाबत रामदास आठवले थेट ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करणार