मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपकडून द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत एन डी ए उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर केलं आहे. शिवसेना आणि भाजप मध्ये काही दिवसांपासून मतभेद सुरू आहेत. यावरून आता शिवसेनेचा द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला आहे भाजपला नाही, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
“पवार साहेबांनी भाजपचा अश्वमेध रोखला”
भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेण्यात आली होती. खासदारांची भुमिका काय आहे हे पाहण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक खासदार उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर आता खासदार ही शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी खासदारांची मागणी मान्य केली आणि दौपद्री मुर्म यांना पाठिंबा जाहीर केला.
“वेळ पडली तर मंत्र्यांच्या गाड्या देखील फोडू”; ओबीसी संघटनेने सरकारला दिला इशारा
शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा हा द्रौपदी मूर्मू यांना असणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनीही खासदारांची भुमिका समजून घेतली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत देशात वेगवेगळे मत प्रवाह आहेत. द्रौपदी मूर्मू या पहिल्या आदिवासी भागातील महिला आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. शिवसेनेने या पुर्वी प्रतिभाताईना पाठिंबा दिला होता. त्यावेळी एनडीएला दिला नव्हता. एनडीएत असताना प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेला अशा प्रकारचे निर्णय घेण्याची परंपरा आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. पक्षप्रमुखांचा निर्णय सर्वाना बंधनकारक आहे असं राऊत म्हणाले.
“मला गद्दार म्हणा किंवा अजून काही, माझी प्रतिक्रिया तीच राहणार”; उदय सामंतांची पत्राद्वारे भूमिका
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित 9 जुलै रोजी मातोश्रीवर बैठक पार पडली होती. या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे विधान परिषदेचे सर्वाधिक 13 आमदार आहेत. त्यामुळे आता विधान परिषेदमधील विरोधी पक्षनेता कोण असणार ? त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं.
Read also
- कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
- कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; तात्काळ पदावरून काढलं
- पाहिला.. पाहिला.. पाहिलो वो, माझा देव कुणी पाहिला; चिमुकल्याला फडणवीसांची भुरळ
- साहेब तुमच्या पत्राने शंभर हत्तीचं बळ मिळालंय; आमदार राहुल पाटलांचे उद्धव ठाकरेंना पत्र