बीड : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. यावरून संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा समाजाने मूक आंदोलन केले. तसेच, राज्यात इतरही अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर, सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो
यावेळी, मराठा आरक्षण, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत अंतर्भाव करून घेणे, भूसंपादनाचा मावेजा देणे, वाळू घाट सुरु करणे, ऊसतोड कामगार कायदा या विषयांच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या मागण्यांवरून बोलताना त्यांनी, ठाकरे सरकार आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला.
महसूल खातं मिळालं नाही ही खंत असेल, राजीनामा देऊन समाजावर असलेले प्रेम दाखवून द्या?
“वडेट्टीवार म्हणतात मराठा समाजाचा आयोगच बोगस आहे. मी तर म्हणतो, वडेट्टीवारचं बोगस, फडतूस आहेत. ते फन्टूस औलाद आहेत, हे मी थेट म्हणतो आणि आता वडेट्टीवारांनी आमच्या आमच्या जिल्ह्यात पोलिसांसह येऊन दाखवावं, आईशप्पथ! बघ आम्ही कसा सत्कार करतो. त्यांनी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावली. १५ महिने ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीच्या तारखा लांबवल्या,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांचा समाचार घेत त्यांनी, “गेल्या २ वर्षात या सरकारने सर्व सवलती बंद केल्या असून, सगळ्याची वाट लावली आहे, जर महिनाभरात आरक्षणचा निर्णय झाला नाही, तर पुन्हा आमच्यकडून मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार
“महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर, मराठ्यांचे आरक्षण गेले, ओबीसींचेही राजकीय आरक्षण गेल, आता दोन्ही आरक्षण वाचवण्यासाठी, या निष्क्रिय राज्य सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. मराठा समाजाच्या १७ पिढ्या, या सरकारने अगदी बर्बाद केल्या, आता त्यांनी मराठा आरक्षणासोबतच आमच्या इतरही सर्व मागण्या मान्य कराव्यात, नाहीतर या सरकारला झोपू देणार नाही,”असा इशारा सरकारला दिला आहे.
Read Also :
- तीन पक्ष आपापसात भांडतायंत का? हो तीन पक्ष भांडतायंत अन् जनतेला त्रास देतायं
- मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री करणार समुद्राचंही पाणी गोड, निर्णयाचं केलं थेट इस्त्रायलनं कौतुक
- मोठी बातमी! अखेर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क कपातीचा दिलासा!
- “अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
- आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला