मुंबई : राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, ११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, तर मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्णय घेईल, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. हे सर्व जिल्हे सोडून इतर २२ जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
अखेर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर, पुणेकरांना दिलासा नाहीच
या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, “कोरोनाच्या मागच्या लाटेत मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे हॉटस्पॉट होते. पुण्यात परिस्थिती पूर्वपदावर यायला वेळ गेला होता. पुण्यात कोरोनाचा स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही, अजूनही तिथली परिस्थिती नियंत्रणात नाही. त्यामुळे पुणेकरांना थोडी कळ सोसायला हवी. त्यांनाही शिथिलता देऊ,” असं म्हटलं आहे.
“अजित पवारांसारखा वक्तशीर आणि दिलेल्या शब्दाला पक्का असा दुसरा माणूस नाही”; चंद्रकांत पाटलांचा टोला
“संभाव्य तिसरी लाट मागच्या लाटेपेक्षा मोठी असेल असं सांगितलं जात आहे. त्यासाठीच्या उपायोजना राज्य सरकारकडून केल्या जात आहेत, पण सध्याची स्थितीदेखील सगळं काही सुरू करावं अशी नाही. त्यामुळे आम्ही मोठ्या शहरात शिथिलता देताना विचारपूर्वक निर्णय घेत आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.
“मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण…”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
दरम्यान, मुंबई-पुणे दोन्ही शहरे मोठी आहेत आणि कोरोना स्प्रेडर आहेत, तसेच मागच्या लाटेत महामारीचे हॉटस्पॉट बनली होती, असे असताना एकीकडे मुंबईमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, तर महिन्याभरापासून पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्क्यांहून खाली असणाऱ्या पुणे शहराला मात्र लेव्हल ३ च्या निर्बंधांमध्येच ठेवले गेले आहे, असे का? असा व्यापारी आणि नागरिकांकडून सरकारला केला जात आहे.
काय आहेत पुण्यातील नियम ?
११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध
- सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
- रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी ४ वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.
- उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..
- सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५ वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
- खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.
- कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.
- क्रीडा- सकाळी ५ वा.पासून सकाळी ९ वा./ सायं ६ वा. पासून सायं.९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
- चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
- सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
- अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
- बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.
- बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
- कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.
- ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
- जमावबंदी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.
- व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
- सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
- मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे ३ ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
- खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
- उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.
उत्पादनाच्या अनुषंगाने…
- अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)
- सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)
- राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
- अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील
Read Also :
- आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे
- लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का?, भाजपचा खोचक सवाल
- औरंगाबाद पंचायत समितीत राडा; भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
- छत्रपती शिवाजी महाराज नाव बदलून अदानी करणं योग्य नाही – नवाब मलिक
- चंद्रकांत पाटील यांची घोषणा, निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा