मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीड येथील महाप्रबोधन सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली होती. मुंबई महापालिकेत सत्ता असतानांही मातोश्रीवर मजला चढला नाही. पण कृष्णकुंज च्या बाजुला अपार्टमेंट तयार झाला. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“उगाचच राग राग करण्याऐवजी संजय राऊतांनी थेट खासदारकीचा राजीनामा द्यावा”
वरचा मजला रिकामा, असा मराठीत वाक्प्रचार आहे, परंतु आमच्याकडे एक सुशी ताई आहेत. ज्यांच्या वरच्या मजल्यावर घनदाट अंधार आहे. आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकूल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात. अशी टिका ही त्यांनी केली आहे.
“आजपासून आम्ही उद्धव ठाकरे गटात सामील”; बुलढाण्यात बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी
दरम्यान, ती म्हणाली होती, इतके वर्ष महापालिकेत सत्ता असूनही मातोश्रीवर मजला चढला नाही पण कृष्णकुंजच्या बाजूला अपार्टमेंट झालं. हे बोलण्याच्या अगोदर तीने आपल्या मालकाला विचारलं पाहिजे होतं. माझा नेता व्यवसाय करून अन् शासनाचे सर्व नियम पाळून इन्कम टॅक भरतात. ते टोपल्याच्या खाली झाकून त्यांनी बंगला बांधला नाही. मातोश्री 2 कशी झाली. 126 कोटी बापाचे, अन् 11 कोटी कसे झाले? हे धंदा करत होते, काय करत होते? कशाला बोलताय. स्त्री म्हणून गप्प आहे. नाही तर यापुढे राज ठाकरेंवर टीका कराल तर आम्हाला सगळेच माहिती आहे. असा इशाराही मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी सुषमा अंधारे यांना दिला आहे.
‘वरचा मजला रिकामा’ असा मराठीत वाक्प्रचार आहे,परंतु आमच्याकडे एक सुशी ताई आहेत ज्यांच्या ‘वरच्या मजल्यावर’ घनदाट ‘अंधार’ आहे. आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही.आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात. #MNS
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) December 3, 2022
Read also
- “शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली..!” संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज ठाकरे गटात
- “आता एकत्र आलं पाहिजे, कारण मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटताहेत”; उद्धव ठाकरे
- “सावध रहा, त्या बुरसट रूढींना पुन्हा परत आणण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करताहेत”; जंयत पाटील
- “आता बेळगावसाठी मुख्यमंत्री नवस का करत नाही”; ठाकरेंचा शिंदेंना टोला
- “बच्चू कडूंची अवस्था म्हणजे, नोकरीवर आहे, पण साहेबांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं”