कोल्हापुर : मागील काही दिवसापासून शिवसेनेचे नेते राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे करून बंडखोर आमदारांवर तुटून पडत आहेत. महाप्रबोधन यात्रेतून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे बंडखोर आमदार आणि राज ठाकरे यांच्यावर कडाडून टिका करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊतांनी नाशिक मधून बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राऊतांना खासदाराकीचा राजीनामा देण्यास सांगितले आहे.
संजय राऊत आता आम्हाला आता पाण्यात बुडवण्याची भाषा करतात. पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही शिवसेना अजून किती बुडवणार आहात? तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आला आहात? शिंदे गटातील आमदारांवर राग काढण्याआधी तुम्ही खासदाराकीचा राजीनामा द्या. असं क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
“..तर आता माझ्यावर पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
राज्यातील राजकीय वातावरण गेल्या मागील काही दिवसापासून अस्वस्थ झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता टिकेची पातळी खालच्या स्तरावर निघून गेली आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टिका केली आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा देखील समाचार घेतला आहे.
Read also
- “आजपासून आम्ही उद्धव ठाकरे गटात सामील”; बुलढाण्यात बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी
- “उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या सुडाच्या राजकारणाला लगाम लावला”
- “तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं”; उदयन राजेंचा आक्रमक पवित्रा
- “गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात, मग राज्यपाल, मंत्र्यांना का देत नाही”; संजय राऊत
- भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुण्याची ‘सुभेदारी’