नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिकेनंतर निलंबित झालेल्या काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बाहल करण्यात आली आहे. त्यानंतर राहुल गांधी आज तब्बल १३६ दिवसानंतर संसदेत दाखल झाले आहेत. यावेळी काॅंग्रेसच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर राहुल गांधी यांना खासदारकी बाहाल करण्यात आली आहे. यावर आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…देशातील सर्व विरोधक मुंबईत एकवटणार, महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
न्यायाच्या मार्गाने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचा राहुल गांधी यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आपल्या देशासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्यांना गप्प करण्याच्या कारवाया सारं जग पाहत आहे. असल्या कृत्यांमुळे भारताची बदनामी होत असून आम्ही ह्या दडपशाही विरोधात लढा देत राहू. आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू. असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“आर…दादा आम्ही शरद पवार साहेबांचा आदर करुच, परंतु..,” भाजपचा रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलं आहे. २३ मार्चला सुरत कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर २४ मार्चला निलंबन झालं होतं. जवळपास चार महिन्यानंतर राहुल गांधी यांना दिलासा मिळाला. त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न”, वाचा सविस्तर
दरम्यान, मोदी आडनावावरून टीकेच्या प्रकरणात राहुल गांधी यांची शिक्षा सुरत सत्र न्यायालय, सुरत जिल्हा न्यायालय, अहमदाबाद हायकोर्ट या गुजरातच्या तिन्ही कोर्टात कायम राहिली आहे. अखेर सुप्रीम कोर्टात राहुल गांधी यांना या प्रकरणी माफी मागायला नकार दिला होता. त्यानंतरही शिक्षेला स्थगिती आहे.
.@RahulGandhi अभिनंदन! न्यायाच्या मार्गाने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचा तुमचा मार्ग मोकळा झाला.
आपल्या देशासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्यांना गप्प करण्याच्या कारवाया सारं जग पाहत आहे. असल्या कृत्यांमुळे भारताची बदनामी होत असून आम्ही ह्या दडपशाही विरोधात लढा देत राहू!
आम्ही सत्य,… pic.twitter.com/bErDNAlDPk
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अंबादास दानवे, सत्तार अन् भुमरे यांच्यात जोरदार राडा, बैठकीत मोठा गोंधळ
हेही वाचा…“देशपातळीवर नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय मला दिसत नाही”, अजित पवार
हेही वाचा…राहुल गांधी संसदेत पुन्हा परतले, मोदी-शहांना राहुल गांधींची भिती
हेही वाचा…“तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा”
हेही वाचा…भुजबळानंतर शरद पवारांच्या निशाण्यावर आता दुसरा मंत्री, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात पवारांची दुसरी सभा