पुणे : मनसेचे फायर ब्रॅन्ड नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला आज जय महाराष्ट्र केला. वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत नेत्यांवर गंभीर आरोप करत आपली पुढील राजकीय भूमिका पुणेकर ठरवतील ती घेणार असल्याचे स्पष्ट केले. यातच आपल्या भावना व्यक्त करतांना वसंत मोरे यांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झालेत. तर पुढील राजकीय भूमिका दोन ते तीन दिवसात घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर आता खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना सल्ला दिलाय.
हेही वाचा…“लोकसभेपुर्वी मोठा भुंकप, ‘या’ राज्यात भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा, राजकीय हालचाली वाढल्या”
वसंत मोरे यांनी मनसेनेला आज रामराम ठोकला. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, यावर मी काय बोलू. त्यांनी पुढील दिशा ठरवली पाहिजे. लोकसभा लढवायची असेल तर कोणत्या पक्षाकडून हे त्यांनी ठरवलं पाहिजे. वसंत मोरे यांनी फक्त भाजपच्या वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये. शरद पवारांकडून मोरेंनी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय ? शरद पवार देशाचे नेते आहेत, असंही राऊतांनी म्हटले.
हेही वाचा…“अजित पवारांवर केलेली टिका शिवतारेंच्या जिव्हारी.,” महायुतीच्या नेत्यांकडून शिवतारेंना दिली समज
दरम्यान, गेल्या दीड-वर्षापासून मी पुणे शहरात लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. माझ्यावर वारंवार माझ्या शहरातीलच काही पदाधिकारी, जे स्वत: इच्छूक नव्हते, पण निवडणुका प्रत्यक्ष जवळ आल्या. त्यावेळेस इच्छूकांची यादी वाढत गेली. जे दोन ते तीन चार जण इच्छूक आहेत. त्यांना राज साहेबांनी लोकसभेची उमेदवारी द्यावी. मी गरज पडल्यास शनिवार वाड्यावर जाईन आणि पुणेकर जी काही भूमिका घेतील. ती मला मान्य असेल. असेही वसंत मोरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे..! ठाकरेंकडून थेट प्रचार करण्यास सुरूवात, उद्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
हेही वाचा…“‘मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले’” वसंत मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले
हेही वाचा“वसंत मोरे भाऊ तुझी लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम खुले,” रूपाली पाटलांची पोस्ट व्हायरल
हेही वाचा.मनसेने पुण्यातला हिरा गमावला..! वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
हेही वाचा…हरियाणात मोठा भुंकप..! तिकडे एवढासा पक्ष स्वाभिमान दाखवतो, अन् इकडे लोक मुंबई ते दिल्ली विमानाचा डेलीपास काढून बसलेत