मुंबई : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. दहशतवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असता तरी शिंदेंची सुरक्षा उद्धव ठाकरे यांनी नाकारली होती. असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. त्यासंदर्भात आता राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता भाजपनेते नितेश राणे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
“आढळराव पाटलांची सेनेतून बाहेर पडण्याची वेळ चुकली”; सचिन अहिरांचं वक्तव्य
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी सध्या सभ्य वाटणाऱ्या पक्षप्रमुखांनी माझ्या वडिलांना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या होत्या. एकदा म्याॅव म्याॅव संपु दे त्यांनंतर आम्ही योग्य प्रकारे वस्र्हरण करू, त्याचबरोबर सहव्याज परतफेड करू असा इशारा देणारा ट्विट नितेश राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.
“माझ्या हिमंतीवर मी निवडून येतो, मला कुणाची गरज नाही”; शिवाजीराव आढळराव पाटील
सुहास कांदे यांच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली आहे, म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्यावर अशा प्रकारे आरोप करीत आहेत. झे़ड प्लस, वाय ही सुरक्षा पुरवणे हा केंद्राचा विषय असतो, सुरक्षेच्या बाबतीत रोंग नंबर लागला आहे, आता केंद्राने या गद्दारांना वाय सुरक्षा पुरवली आहे. शंभुराज देसाई यांच्याकडे ग्रामीण सुरक्षा विभाग येतो. त्यामुळे मातोश्रीवरून फोन गेला हा आरोप खोटा आहे, असं शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
“साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष ही विरोधी बाकावर बसण्यात गेलीत”; आव्हाडांनी सांगितला जुना किस्सा
दरम्यान, शंभुराजेंना वर्षा बंगल्यावरून फोन आला होता की एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका. का सुरक्षा दिली नाही. असा सवाल देखील त्यांनी केला. यावर काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. सुरक्षा देण्यामागे गृहराज्यमंत्री घेत असतात तो निर्णय मुख्यमंत्री हे घेत नसतात. चिप सेक्रेटरीच्या खाली एक समिती असते. त्यावर ते अभ्यास करतात. मग सुरक्षा दिली जाते. तसेच एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना पोलीस खातं अधिक सुरक्षा देते यावर काही तथ्य नाही. असंही सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
Just like Eknath Shinde ji .. several “suparis”were given to finish my father when he left the Sena.. by the so called sober and decent Paksha Pramukh!
Let the meow meow finish.. then we will start with the “Vastraharan” with interest 😊— nitesh rane (@NiteshNRane) July 23, 2022
Read also
- गृहमंत्रिपद मिळाल्यास तरच सरकारमध्ये सामील होऊ; अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य
- “जरंडेश्वर कारखान्याची 10000 कोटींची बेनामी संपत्ती लवकरच ताब्यात घेऊ”; अजित पवारांना शिंदे गटाच्या आमदारांनी ललकारलं
- “मग त्यांनी ‘या’ दाढीला पकडलं, अन्..;”खैरेंचा एकनाथ शिंदे अन् फडणवीसांवर हल्लाबोल
- “आदित्य ठाकरेंचं जेवढं वय नाही तेवढं आम्ही राजकारण केलंय”; रामदास कदमांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
- “पुणे महापालिकेत 100 पेक्षा नगरसेवक निवडून आणून फडणवीसांना गिप्ट देणार”; जगदीश मुळीक