सातारा : मागील काही दिवसात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अजित पवारांच्या संबंधित या साखरखान्यांवर आयटीची धाड देखील पडली होती. आता याच दरम्यान एकनाथ शिंदे गटातील महेश शिंदे यांनी अजित पवारांचा ललकारलं आहे. तसेच लवकरच जरंडेश्वर साखर कारखाना लवकरच ताब्यात घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष ही विरोधी बाकावर बसण्यात गेलीत”; आव्हाडांनी सांगितला जुना किस्सा
महेश शिंदे यांनी जरंडेश्वर कारखान्याची 10000 कोटींची बेनामी संपत्ती जमा करून साडेतीन महिन्याच्या आत जरंडेश्वर कारखाना ताब्यात घेणार आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचे कर्तेधर्ते अजित पवार यांनी कारखान्याच्या सभासदांना फसवत काऱखाना गिळंकृत केल्याचा आरोप महेश शिंदे यांनी अजित पवारांवर केला आहे. स्वर्गीय यशवंतरावांचे पाईक असणाऱ्या चेल्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांना गुलाम बनवण्याचे काम चालु केले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
“ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका”; निलेश राणेंचं गंभीर वक्तव्य
शरद पवार यांनी रयत शिक्षणसंस्था हडप केली, असा आरोप देखील महेश शिंदे यांनी केला आहे. जरंडेश्वर कारखाना सुद्धा तुम्ही चोरला आहे. हे जर तुम्ही सोडणार नसला तर ती घ्यायची ताकद या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक युवकाच्या मनगटात आणणार असल्याचेही शिंदेंनी म्हटलं आहे. आमदार महेश शिंदे हे शिवसेनेचे कोरेगावचे आमदार असून ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
“आदित्य अजून लहान आहे, त्यांनी कंस बोलावं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं”
दरम्यान, गेल्या काही महिन्यात अजित पवार यांच्या संबंधित व्यक्ती आणि साखर कारखान्यांवर आयटीची धाड पडली होती. त्या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्यांनी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तर आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार देखील अजित पवार यांच्या मागे लागले असून आगामी काळात कशापद्धतीच्या राजकीय घडामोडी घडणार ते पहावं लागणार आहे.
Read also
- “मग त्यांनी ‘या’ दाढीला पकडलं, अन्..;”खैरेंचा एकनाथ शिंदे अन् फडणवीसांवर हल्लाबोल
- “आदित्य ठाकरेंचं जेवढं वय नाही तेवढं आम्ही राजकारण केलंय”; रामदास कदमांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
- “पुणे महापालिकेत 100 पेक्षा नगरसेवक निवडून आणून फडणवीसांना गिप्ट देणार”; जगदीश मुळीक
- “आढळराव पाटलांची सेनेतून बाहेर पडण्याची वेळ चुकली”; सचिन अहिरांचं वक्तव्य
- “माझ्या हिमंतीवर मी निवडून येतो, मला कुणाची गरज नाही”; शिवाजीराव आढळराव पाटील