मुंबई : भाजप नेते किरिट सोमय्या, शिवसेना नेत्यांवर सातत्याने आरोप करुन त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर, त्यांनीच पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एका तक्रारीवरुन सोमय्या सवाल उपस्थित करत आरोप केला आहे.
“मुख्यमंत्री मरू द्या”, वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा अखेर माफीनामा
यासंदर्भात सोमय्या यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी, ‘खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे 5 वाजता, 7 कोटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7/7/2019 रोजी सकाळी 5 वाजता, 7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलिस ठाण्यात केली आहे. एवढी रोख रक्कम आली कुठून?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी?
शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7/7/2019 रोजी सकाळी 5 वाजता ₹7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली
एवढी रोख रक्कम आली कुठून? pic.twitter.com/0nBngqhWrx
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 16, 2021
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्फोटक पत्र लिहिलं असून, शिवसेनेच्या नियमबाह्य कामांमुळे आणि दहशतीमुळे, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद पडतील”, असे पत्रात नमूद करत, स्थानिक नेत्यांचे असेच प्रकार सुरु राहिले, तर राज्यात रस्त्यांच्या कामांना नवीन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल,” असा थेट इशारा दिला होता. या पत्रात त्यांनी वाशीम जिल्ह्याचा विशेषत्त्वाने उल्लेख केला होता.
ताकद पहायची असेल तर दत्तात्रय भरणेंनी उजनी धरण ओलांडून दाखवाव – शिवसेनेने दिला दम
या पार्शवभूमीवर, हा प्रकार उघडकीस आला असल्याने संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, याबाबत गवळी यांना विचारले असता, “जिल्ह्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम ९०% पूर्ण झाले आहे. मात्र, काही जण केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता याप्रकरणी मी स्वतः केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार असून, त्यांना सगळ्या गोष्टी सांगणार आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Read Also :
- “मुख्यमंत्री मरू द्या”, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली
- बाबासाहेबांनाही कधी वाटलं नसेल, भविष्यात असे राज्यपाल येतील म्हणून; हसन मुश्रीफांचा कोश्यारींवर घणाघात
- १२ सदस्यांच्या यादीवर राज्यपालांनी अजित पवारांचा काढला चिमटा; काँग्रेस नेत्याला खडेबोल सुनावले
- “शिवसैनिकांना आवरा नाहीतर…”, गडकरींचे मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र
- गडकरींच्या स्फोटक पत्राची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत, पोलीस महासंचालक दिले महत्त्वाचे आदेश