मुंबई : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपकडून आता विधानसभेच्या अध्यक्षासाठी राहुल नार्वेकर यांच्या निवड केली आहे. त्यांनी आज त्यासाठी अर्ज दाखल केला आहे. अशातच आता विरोधी पक्षनेता कोण असणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे जास्त आहे. त्यामुळे शिंदे सरकारला टक्कर देण्यासाठी मोठा नेता देण्याची शक्यता आहे.
“लक्षात ठेवा.. यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
शिंदे सरकार आणि भाजपला विधानसभेत चारीमुंड्या चित करण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तसेच आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता बनवा अशी शरद पवारांची इच्छा आहे. अशी माहिती देखील समोर आली आहे.
“ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
गेल्या एक ते दोन वर्षापासून विधान सभा अध्यक्षांची निवड रखडलेली होती. याकाळात विधानसभा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी कारभार सांभाळला होता. अशातच आता शिंदे सरकार अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे. यासंदर्भात तात्काळ सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने सर्वाेच्च न्यायलायत केली होती. मात्र ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी 11 जुलै रोजीच होणार आहे.
सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
शिंदे गटातील दिपक केसरकर विधान सभा अध्यक्ष झालेत तर बंडखोर 16 आमदारांवरील निलंबणाची कारवाई टळू शकते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांसाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार असून शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांच्या नावाची शिफारस करण्याची शक्यता आहे. तसेच विधिमंडळातील दिर्घ अनुभव असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील सरकारच्या काळात जवळपास 5 वर्ष विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी संभाळली होती.
Read also
- “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”
- “तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
- “राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री द्या”, बच्चू कडूंची मागणी; तर मंत्रिपदावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी