पुणे : पिंपरी चिंचवड येथे काल मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवसेशनांचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकारांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चॅनेलमधील मुली साडी का नेसत नाहीत. असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा”; महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक
चॅनेलमधील मुली साडी का घालत नाहीत. त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलत असताना मराठी संस्कृतीला शोभणारे कपडे का घालत नाहीत? आपण सगळ्या गोष्टींचं पाश्चिमात्यीकरण करत आहोत. काय घालायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मग फक्त दिवाळी असली की सगळे तयार होऊन जातात. आत्मनिर्भर भारत म्हणत असताना चॅनेलवर आत्मनिर्भर महाराष्ट्रा का नाही. अशी विचारणाही सुळेंनी महिला पत्रकारांनी केली.
“राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय”; काॅंग्रेसची जहरी टिका
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे. टिकली वर टिका करणारे साडी वर या नेत्यांना सोलणार का ? चला तुमची परिक्षा एकदा होऊन जाऊ द्या. असं म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे.
“मराठवाडा विद्यापीठासाठी आंबेडकर अन् यशवंत चव्हाणांचं मोठं योगदान”; शरद पवार
अलिकडेच संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकारांना टिकलीवरून प्रश्न केला होता. टिकली लावली नाही म्हणून संभाजी भिडे यांनी त्या महिलेशी बोलण्यास टाळलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीने मैदानात उतरून संभाजी भिडे यांचा निषेध व्यक्त केला होता. त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकारांच्या ड्रेसकोडवरून सवाल केल्याने राज्यात गोंधळ माजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, बिंदी पर टिप्पणी करने बखैडा खडे करनेवाेल साडी पर टिप्पणी करने वाले इस नेता को टिप्पणी किये बगैर बखैडा खडा किये बगैर ही छोड देंगे क्या. ? चलो आप लोगों की इस बार परिक्षा हो जाये. असं हिंदी मध्ये म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवरून पत्रकारांवर देखील टिप्पणी केली आहे.
Read also
- “आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपकडे आलो”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
- “केंद्र सरकार चांगलं काम करतंय, मोदी माझे आवडते पंतप्रधान”; सुप्रिया सुळे
- “आमचे वैचारिक व्यासपीठ एकच, दोन्ही विचारांचे वारसे घेऊन चालतोय”; उद्धव ठाकरे
- “हीच संवेदनशीलता एका नेत्याला लोकनेता बनवते”; अन् एका महिलेच्या खांद्यावरील बॅग राहुल गांधींनी घेतली
- या 8 प्रश्नाचं उत्तर देईल का खोके सरकार ? आदित्य ठाकरे यांचे शिंदेंना सवाल