मुंबई : गेल्या दीड वर्षापासून शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. परंतु या प्रकरणावर अद्यापही निकाल लागलेला नाही. विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जात असतांना विधानसभा अध्यक्ष सध्या संसदीय लोकशाहीवरील राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी घानाला जात आहे. यावरून आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’ला नोटीस, ‘बारामती ॲग्रो’ नेमकी काय आहे ? वाचा सविस्तर
महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाहीचा निर्णय प्रलंबित असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून उशीर होत आहे. महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकारला संरक्षण देण्यासाठी हेतुपुरस्सर हा उशीर केला जातोय. गंमत म्हणजे, अध्यक्ष राहुल नार्वेकर संसदीय लोकशाहीवरील राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी घानाला जात आहेत. संसदीय लोकशाहीचे रक्षण आणि संवर्धन करण्याबाबत ते काय बोलणार किंवा महाराष्ट्रातील लोकशाहीचा घात होत असताना ते संमेलनात कसे सहभागी होऊ शकतात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…‘या’ तीन मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट होणार, भाजप विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धक्कातंत्राचा वापर करणार
दरम्यान, : शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या सुनावणीचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं आहे. त्याविरोधात आता ठाकरे गटातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार होती परंतु आता पुढची तारीख 6 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे.
The decision on Maharashtra’s parliamentary democracy is kept pending and delayed on Speaker Rahul Narvekar’s table (as tribunal).
Done purposely as if to protect an unconstitutional govt that was forced on to Maharashtra, a year ago!
Ironically, speaker Rahul Narvekar, he is…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जगाला दाखवण्यासाठी गांधी आणि मनामध्ये गोडसे हे भाजपाचे ढोंग!” काॅंग्रेसची जोरदार टिका
हेही वाचा…सदावर्तेंकडून गोडसेचं उदात्तीकरण, “भाजपचा हात असल्याशिवाय अशी पिलावळ..,” वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा…“मलाही मुंबईत घर घेण्यास अडचण आली”, पंकजा मुंडेंनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
हेही वाचा…” छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“पुन्हा हे असं घडलं तर गालावर वळ उठतील,” मुंलूंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा