मुंबई : वेदांता फॉक्सकॉन हि कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होती, पण महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. या टिकेला उद्योगमंत्री उद्य सामंत यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
“सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
केवळ काहीच दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. तेव्हा फॉक्सकॉन वेदांताने सांगितले की, गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक चांगले पॅकेज देऊ केले. त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. भरपूर प्रयत्न करूनही त्यांनी आधीच्या गुजरातच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले. आता दोषारोपच करायचा असेल तर मग मविआच्या काळात फॉक्सकॉनला चांगले पॅकेज का देण्यात आले नाही?, असा सवाल मंत्री उद्य सामंत यांनी उपस्थित केला आहे.
“आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
दोन वर्षांपासून ते गुजरातशी वाटाघाटी करीत असताना आधीच्या सरकारने त्यांचे मन का वळविले नाही? अडीच वर्षांच्या मविआच्या काळात कोणती मोठी गुंतवणूक आली? यापेक्षा कितीतरी अधिक गुंतवणूक 2014 ते 2019 या भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात आली होती. प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख आहे. पण, निराश असलो तरी खचलो नाही. आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला निश्चितपणे नेऊ, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
फॉक्सकॉन वेदंता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, असं उद्य सामंत म्हणाले आहेत. वेदांताची गुंतवणूक गेली यानंतर आता नाणार रिफायनरीबाबतही उद्य सामंत यांनी भीती व्यक्त केली आहे.
Read also
- “पुण्यात तरूणीचा अश्लिल डॉन्स व्हिडीओ व्हायरल; रूपाली पाटलांनी बोलवून घेत दिली तंबी”
- “देशातील सर्वात मोठा प्रकल्प ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला नेण्यात आला”
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”