मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबियांचे आणि शिवसेनेचे वैर हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. आज सकाळीच नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता.
सदावर्ते हे आमचे वकील आहेत, भूमिका पटली नाही तर वकील बदलून टाकू – अजय गुजर
सध्या मुंबईकरांसाठी वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयातील एका ग्रॅनाईटबोर्डचा फोटो कमालीचा व्हायरल होत आहे. यामध्ये निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की तमाम हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या शिवसेनचं नाव बदलणार का? असा संतप्त सवाल निलेश राणे शिवसेनेला विचारला आहे. त्यांनी ट्विटकरत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग देखील केले आहे.
“संजय राऊतांनी शिवसेनेतील बाकीच्यांना जवळजवळ नामशेष केले”; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
व्हायरल होणाऱ्या प्राणी संग्रहालयातील एका ग्रॅनाईटबोर्डमध्ये हजरत अली पीर बाबा राणी बाग असं लिहिण्यात आलेली एक पाटी दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियात कमालीचा व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी
अनेक जण या फोटोला फॉरवर्ड करत महाराष्ट्रात नक्की काय चाललंय? वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान नाव गायब झालं का? ही आता नुसती राणीची बाग नाही तर हजरत हाजी पीर बाबा राणीची बाग असं म्हणायचं अशा आशयाचे कॅप्शन देऊन व्हायरल केले जात आहेत. उद्यानाच्या नाव बदलावरून आता वादंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read also:
- “मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नाही”; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी
- ‘शहा मस्त तर त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त’; शहांच्या दौऱ्यावरून शिवसेनेने केले भाजपला टार्गेट
- हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची पहिलीच मागणी अजित पवारांनी केली मान्य..
- विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी; ७० हजार कर्मचारी अजूनही संपावर ठाम