मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बहुदा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावरही विश्वास नाही. त्यामुळे ते त्यांच्याकडेही मुख्यमंत्रीपदाचा चार्ज देत नाहीयत, अशी जोरदार टोलेबाजी बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकाही केली.
सदावर्ते हे आमचे वकील आहेत, भूमिका पटली नाही तर वकील बदलून टाकू – अजय गुजर
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देउ शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
“संजय राऊतांनी शिवसेनेतील बाकीच्यांना जवळजवळ नामशेष केले”; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
मग आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला त्यांना हरकत काय आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते, असे विचारले असते चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी परीक्षा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी केली. ते म्हणाले, राज्याच्या पोलीस किती सक्षम आहेत ते दिसलं. इतक्या मोठ्या प्रमाणात स्कॅम आहे. तो बहुदा मंत्रालयापर्यंत येऊन भिडतो आहे. एका मंत्र्याचे नाव अस्पष्टपणे यायला सुरुवातपण झालीय. अशावेळी महाराष्ट्र पोलीस कशी काय चौकशी करणार. त्यामुळे आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शेवटी लोकशाहीमध्ये आम्हाला काही मागणी करण्याचा अधिकार तरी आहे की नाही. की तोंडं दाबून ठेवणार आहात. तुम्हाला काय करायचे ते करा. आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
Read also:
- ‘शहा मस्त तर त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त’; शहांच्या दौऱ्यावरून शिवसेनेने केले भाजपला टार्गेट
- हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची पहिलीच मागणी अजित पवारांनी केली मान्य..
- विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी; ७० हजार कर्मचारी अजूनही संपावर ठाम
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी