मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील इटीआयएम मशिनच्या कंत्राटात परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करून २५० कोटींचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर आता राज्यपाल यांचे आदेशानुसार प्रभारी लोक आयुक्त यांनी चौकशी सुरू केली असून, २ सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी ठेवण्यात आली आहे.
“राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नुकतेच परिवहन विभागातील बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांशी संगनमत ठेऊन कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खुद्द परिवहन विभागातच एका निलंबित अधिकाऱ्याने केला होता. त्यांनतर आता एसटी महामंडळातील इटीआयएम मशीनच्या कंत्राट प्रकरणात भाजपा आमदाराने २५० कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला असून, राज्यपालांनी यासबंधीत चौकशीचे आदेश लोकायुक्तांना दिले आहे.
संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान
त्यानुसार आता लोकायुक्तांनी आमदार मिहीर कोटेचा यांना सूनावणीची नोटीस पाठवली असून २ सप्टेंबर रोजी गुगल मिट पद्धतीने ही सुनावणी पार पडणार असल्याचे कळविण्यात आले आहे. राज्यपालांनाकडे तक्रार केल्यानंतर आता लोकयुक्तांच्या चौकशीमध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.
Read Also :
- पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा
- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी
- राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर
- ब्रेकिंग! पारनेर तहसिलदाराने आमदार लंकेच्या जाचाला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा!