मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्टवादीत दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होत आहे. तर अनेक कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करीत आहेत. तर काही आमदार अजूनही तटस्थ आहेत. यातच आता पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची मॅरेथान बैठक पार पडली.
हेही वाचा…अजित पवारांचा राष्ट्रवादीत बंड..! “हा” अख्खा जिल्हा शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिला
पुणे जिल्ह्यातील नागरिक शरद पवार यांच्या पाठीशी कायम राहिला असून आज देखील ते त्यांच्या पाठीशी आहे. सध्याची राजकीय घडामोड लक्षात घेऊन आजच्या बैठकीत तीन ठराव करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पाठीशी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत राहणार आहे. मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीला शहरातील ३०० ते ३५० कार्यकर्ते जाणार आहेत. तसेच भविष्यात कायदेशीर लढा उभा राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही शरद पवार साहेबांसोबत असे प्रतिज्ञापत्र प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून लिहून घेतले जाणार असल्याचं शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…भाजपला पाठिंबा देण्याचे ते पत्र जयंत पाटलांनी दिलंच नाही, शरद पवारांना एकटं सोडण्याचा होता प्लॅन
दरम्यान,अजित पवार यांच्या शपथविधीनंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीत मोठी घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांची बैठक मागच्या १ तासांपासून सुरू होती. . या बैठकीला जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.. या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमका कुणाला पाठींबा देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…१७२ आमदार असतांना पुन्हा ‘अजित पवारांना घ्यायची गरज काय? शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड महेश लांडगे अन् भाजपाच्या वर्चस्वाला धक्का..! राज्यातील बदलत्या समिकरणामुळे स्थानिक पातळीवर फटका
हेही वाचा…“घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं,” राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला डिवचलं
हेही वाचा…“अजित पवारांमुळे भाकरी करपली आता दुसरी तयार करू”, बच्चू कडूंचं मोठं विधान
हेही वाचा…“..त्या दिवशी राजकारणातून निवृत्त होईल”, आव्हाडांना दिलीप बनकराचं उत्तर, राष्ट्रवादीत संघर्ष पेटला