मुंबई : महाराष्ट्रात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. राज्यातील कानाकोपऱ्यातील वारकरी विठ्ठलाच्या जयघोषात पायी चालत पंढरपुरात दाखल होतात. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत पायी दिंडीत सहभागी होतात. दरवर्षी प्रमाणे वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्याच संदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“द्रौपदी मूर्मूंना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला नाही”; राऊतांनी भाजपला डिवचलं
दरवर्षाप्रमाणे विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो. यावर्षी एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची महापुजा केली. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. प्रत्येकांना वाटत होतं की उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान मिळेल पण असं काही घडलं नाही आणि तो मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला.
“आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखा नेता”; विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी सेना, राष्ट्रवादीमध्ये चुरस
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात लोकप्रियता फार मोठी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक लहान मुलगा देखील देवेंद्र फडणवीस यांचा चाहता झाला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून विठ्ठलाची पुजा केली. त्यांचा हा गोंडसपणा सध्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. त्याच्यापाठी मागे पाहिला पाहिला पाहिला वो माझा देव कुणी पाहिला हे गाणं लावण्यात आलं आहे.
“तुमच्याकडे फक्त सहा महिन्याचं आयुष्य, शरद पवारांनी पैज लावली अन् ती जिंकलीही”
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणारा आदिराज थोरात यांनी आषाढी एकादशी निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेला ड्रेस घातला होता. त्यानंतर त्यांनी विठ्ठलाची पुजा देखील केली. त्याच्या मनातील हावभाव पाहुन त्याला देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्य जनतेतील मुख्यमंत्री असल्याचा अजूनही त्याला भास होतोय. तसेच त्या गोंडस मुलाला देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची आस लागून राहिल्याचं दिसत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे त्या लहानग्या मुलाला भेटतील का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सरकार स्थापन होण्याअगोदर विठ्ठालाची महापुजा हे देवेंद्र फडणवीसच करतील. अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर देखील शहराच्या विविध ठिकाणी लावले होते.
चिमुकल्याला देखील फडवीसांची भुरळ पडली
सामान्य जनतेचा मुख्यमंत्री म्हणून या चिमुकल्याला अजूनही फडणवीसांना भेटण्याची आतुर…
भेट होईल का? @Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/INYN6X9NnV
— Amol Thorat (@Amolthoratbjp) July 12, 2022
Read also
- साहेब तुमच्या पत्राने शंभर हत्तीचं बळ मिळालंय; आमदार राहुल पाटलांचे उद्धव ठाकरेंना पत्र
- “पवार साहेबांनी भाजपचा अश्वमेध रोखला”
- “वेळ पडली तर मंत्र्यांच्या गाड्या देखील फोडू”; ओबीसी संघटनेने सरकारला दिला इशारा
- “मला गद्दार म्हणा किंवा अजून काही, माझी प्रतिक्रिया तीच राहणार”; उदय सामंतांची पत्राद्वारे भूमिका
- सदा सरवणकरांचा सेनेला जय महाराष्ट्र; फाटक, शहांची शिवसेनेतुन हकालपट्टी