मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 1000 कोटींच्या मढ स्टुडिओ घोटाळ्यात, महाविकास सरकारचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि BMC व पर्यावरण अधिकारी यांच्या भूमिकेची चौकशी ताबडतोब सुरू करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे. यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
“गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्यात प्रकरणी काँग्रेसचे नेते अस्लम शेख अडचणीत सापडले. यानंतर आता या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या रडारवर युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचीही चौतशी करा अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि सोमय्या यांच्यातील वाद पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.
“आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
अनिल परबांनी दापोलीत समुद्रात जसं रिसॉर्ट बांदलं तसंच मढमध्ये कोरोना काळात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानं मोठमोठी बांधकामे उभी राहिली. समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करून अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास 200 कोटींचा घोटाळा या ठिकाणी झाला आहे. थेट समुद्रात स्टुडीओ आणि इतर बांधकामे केली जात आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी अस्लम शेख यांच्यावर केला आहे.
“तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
यानंतर अस्लम शेख यांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनातील कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी अस्लम शेख यांच्यासोबत भाजपचे नेते मोहित कंबोज हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले होते. त्यामुळे शेख भाजपमध्ये येणार अशी चर्चा सुरू झाली. पण आता सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
Read also
- “अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं
- “अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”
- “मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
- अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
- शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….