पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड करून शिंदे-फडणवीस यांच्या सोबत युती केली. यामुळे आता राज्य पातळी बरोबरच स्थानिक पातळीवर देखील कार्यकर्त्यांची मोठी घुसमट होत आहे. आगामी निवडणूका एकत्रित लढणार असल्याने अनेक उमेदवारांची पंचाईत झाली आहे. कारण मागच्या वेळी ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता त्याच उमेदवारांच्या मांडीला मांडी लावून लढावं लागणार आहे. त्यामुळे मोठी अस्वस्थता सध्या राजकीय नेत्यांमध्ये दिसून येत आहे. यातच आता शिरूर मतदारसंघात ही अशीच अस्वस्थता बघायला मिळत आहे.
हेही वाचा…हिंदुत्व, लव्ह जिहादवरून भाजपच्या नेत्यांना रडवलं, अजित पवार गटाकडून ‘या’ आमदाराची प्रतोद म्हणून निवड
राज्यातील सत्तांतराननतर शिरूर लोकसभेच्या आजी माजी खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच चांगलीच राजकीय चिखलफेक सुरू आहे. अमोल कोल्हे जनतेच्या मनातून पार उतरले आणि ते आता बिनकामाचे खासदार बनलेत अशी कर्मट टीका माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली.राष्ट्रवादीची लोक नाराज आहेत. राष्ट्रवादीमधून आता त्यांना एकत्रित राष्ट्रवादीमधून तिकीट मिळालं असलं तरी त्यांचा टिकाऊ लागला नसता, कारण गावचे लोक चिडू नये. अशी टीका आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा…अत्यंत जवळचा विश्वासू, माजी मंत्री आमदार शरद पवारांची साथ सोडणार
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी देखील आढळराव पाटलांवर पलटवार केला आहे. आडू आडून
पवार साहेबांची जी भेट घेण्यासाठी आढळराव पाटील प्रयत्न करीत आहे. परंतु त्या भेटीची चावी आता माझ्या हातात आहे. असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यामुळे राजकीय समीकरण बदलली आहेत त्यात शिरूर मतदारसंघात कोण बाजी मारणार? अन् या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कुणाला उमेदवारी जाहीर होणार? ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्या दिवशी मंत्रिपद मिळालं, तेव्हा आई शेतात काम करीत होती,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…” राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात विधानसभेच्या ४०० तर लोकसभेच्या १०० जागा करून टाका”
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काॅंग्रेस अलर्ट मोडवर, सगळ्या काॅंग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलवलं
हेही वाचा…“जयंत पाटलांवर अपात्रतेची कारवाई करणार नाही,” अजित पवार गटाचा मोठा निर्णय
हेही वाचा…२१ वर्ष, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही..! शिंदे गटात गेल्याने निलम गोऱ्हेंना आदित्य ठाकरेंचा टोला