मुंबई : राष्ट्रवादीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीच्या निवड समिती बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावं असं प्रस्ताव मांडण्यात आलं. यावेळी खासदार प्रफुल पटेल यांनी दोन प्रस्ताव निवड समिती समोर मांडले. त्याला राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी एकमताने मंजूरी दिली. यानंतर शरद पवार यांच्या सिल्वर ओक आणि मुंबईत कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.
हेही वाचा…‘आता लोकांची खात्री पटली, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली’
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी प्रस्ताव मांडले. या प्रस्तावात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष देशाचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवारसाहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असू त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्ष पदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. असं राष्ट्रवादीच्या पत्रकात म्हटलं आहे. त्यानंतर आता शरद पवार काय भूमिका घेणार? त्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…फॅक्ट चेक : निगडीतील शिवसृष्टीला तर महाविकास आघाडीच्या काळातच ‘खोडा’
निवड समितीची बैठक पार पडल्यानंतर प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषद पटेल यांनी प्रस्तावासंदर्भात माहिती दिली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नेते शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा विचार केला होता. हा राजीनामा एकमताने नामंजूर करून त्यांनीच अध्यक्ष म्हणून एकमताने निवडण्यात येत आहे. असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. त्याचबरोबर आमच्या समितीने घेतलेल्या प्रस्तावाबद्दल आम्ही शरद पवारांची भेट घेऊन आम्ही सर्व त्यांना विनंती करू. असंही पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही”, राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने राजकारणात काहुल माजलं
हेही वाचा…Breaking: शरद पवारांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस समितीचा महत्त्वाचा निर्णय! कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
हेही वाचा…“मी पुन्हा येईन, तो कसा येतो, ते तुम्हाला….”, तापलेल्या राजकारणात फडणवीसांचं सुचक विधान
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार, पुढचा अध्यक्ष ठरला, बैठकीत दोन प्रस्ताव ?”
हेही वाचा…अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘सुपडा साप’