पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेधडक, रोखठोक बोलतात. त्यांच्या बोलण्याची पद्धत सर्वपरिचित आहे. आज पुणे पोलिसांना याचा अनुभव आला. सकाळी सकाळी पोलिस मुख्यालयात दाखल झालेल्या अजित पवारांची ‘दादा’ गिरी आज पुणे पोलिसांना अनुभवायला मिळाली. मुख्यालयात केलेल्या कामाचा दर्जावरून त्यांनी थेट कंत्राटदाराला खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर पोलिसांचे काम असे होत असेल तर बाकीच्यांचे काय असा सवाल करत पवारांनी आयुक्तांना धारेवर धरले.
हे पण वाचा, प्रीवेडींगला कपल येतातं, त्यांना कशाला आडवता, हानिमुनला पण इथेच बोलवा – अजित पवार
हे पण वाचा, कालच्या “त्या” प्रकारणानंतर अजित पवार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘धडक’
अजित पवार म्हणाले, अशा कामाच्या पाहणीसाठी मला बोलावले तर मी लई बारकाईने पाहत असतो. माझ्याच भाषेत सांगायचे तर हे खूप छा-छु काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचीच काम असे केले असेल तर बाकीच्यांचे काय ? असा प्रश्न विचारत त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना धारेवर धरले. तसेच तुम्हाला कामच पाहायचे असेल तर बारामतीला या दाखवतो असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
हे पण वाचा, आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही, चंद्रकांत पाटलांची टीका
हे पण वाचा, अजित पवार म्हणतात, ‘ते जीन्स पँटचं चुकलंच, पण…’
अजित पवारांचा हा स्पष्टवक्तेपणा पाहून उपस्थित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अजित पवारांचा समोर ठेकेदाराला उभे करण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे मात्र पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. खरं तर नूतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी अजित पवारांना बोलावण्यात आलं होतं. अजित पवारांनी मात्र या कामातील त्रुटी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि त्यांना चांगलीच सुनावली देखील. अजित पवारांच्या या स्पष्टवक्तेपणा ची आज संपूर्ण पुणे पोलिस दलात चर्चा सुरू आहे.
हे पण वाचा,
…म्हणून मुंबईकडे निघालेल्या अजित पवार यांनी मारला यु-टर्न आणि पुन्हा परतले पुण्यात
“रायबरेलीत इंदिरा गांधी देखील पडल्या होत्या मात्र दोन पिढ्या आमचं वर्चस्व कायम”; अजित पवार यांचा फोन कॉल व्हायरल
. . म्हणून अजित पवार फडणवीस यांच्या सोबत गेले ! राष्ट्रवादी खासदारानेच केला खळबळजनक खुलासा