पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी राजीनामा का दिला ? याची चर्चा होत असतांना या पदावर आता पुत्र पार्थ पवारांना संधी दिली जाईल. अशी चर्चाही एका बाजूला सुरू आहे.
हेही वाचा…चर्चेत असलेले गोगावले मंत्रीपद सोडून शिंदेंना साथ का देताहेत ? गोगावलेंनीच सांगितलं कारण
गेली ३२ वर्षे अजित पवार जिल्हा सहकारी बॅंकेत काम करत होते. यादरम्यान आशिया खंडातील एक नंबर बॅंक म्हणून नावारूपास आली. पण उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाचा कारभआर वाढला आहे. त्यामुळे पक्षसंघटनेसाठी वेळ आणि उपमुख्यमंत्रीपदाला न्याय देण्यासाठी अजित पवारांनी सहकारी बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. मात्र, अजित पवार दर महिन्याला बॅंकेचा आढावा घेणार असल्याचं पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाेडे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राच्या तळागाळातून ठाकरेंना पाठिंबा, मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन
अजित पवार हे बारामती तालुका अ वर्घ मतदारसंघातून गेली ३२ वर्षे बॅंकेचे प्रतिनिधित्व करत होते. १९९१ पासून अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मोठी आर्थिक प्रगती केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकामध्ये देशातील सर्वात अग्रगण्य बॅंक म्हणून पुणे जिल्हा बॅंकेचा नावलौकिक आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत पार्थ पवारांचा मोठा पराभव स्विकारावा लागला. पार्थ पवारांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न केले जात होते. परंतु मागील काही वर्ष त्यांना अपयश आलेत. आता अजितदादच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष झाल्याने पार्थ पवारांना राजकारणात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांना संधी दिली जाणार असल्याने अजित पवारांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आम्ही ठरवले असते तर शिवतीर्थावर सभा घेतलीही असती, पण..,”दसरा मेळाव्यावरून शिंदेंनी घेतली माघार
हेही वाचा…आमदार अपात्रतेची सुनावणी एक दिवस आधीच होणार, मोठं कारण आलं समोर
हेही वाचा…“तेव्हा महाराष्ट्रात दोनच नेत्यांनी काॅंग्रेसच्या विरोधात रान पेटवलं होतं”, सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“धंगेकरांचा पारा चढला..! अन् थेट ससून रूग्णालय गाठून ‘या’ प्रकरणाबाबत ससून रूग्णालय प्रशासनाला धरले धारेवर
हेही वाचा…“तेव्हा पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान