पुणे : केंद्रीय मंत्री अमित शहा काल दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने सिंहगड काॅलेज येथे आगमन झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी काल पुण्यातील विविध कायक्रमाला उपस्थिती लावली. यातच त्यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचीही भेट घेतली. सध्या पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक लागली आहे. त्यामुळे अमित शहांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा..“निवडणुक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचा शपथविधी, राज्यातील राजकारणाला वेगळं वळण”
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. सुरूवातीला टिळकांच्या घरात उमेदवारी न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु राज्यातील प्रमुख नेत्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळकांची भेट घेऊन नाराजी दुर केली. यातच ब्राम्हण समाजाचा मेळावा देखील पार पडला. याचबरोबर काल अमित शहांनी देखील शैलेश टिळक आणि कुणाल टिळकांची भेट घेतली.
हेही वाचा..““बाळासाहेबांचा जुना रूप उद्धव ठाकरेमध्ये आलं, कार च्या बोनेटवर ठाकरेंची मुंबईत सभा
याआधी अमित शहा यांनी गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. गिरीश बापट गेल्या काही दिवसापांसून आजारी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यातच ओंकारेश्वर मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी बापटांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहा यांनी कसब्यातील पोटनिवडणुकीसंदर्भातही कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याचं बोलण्यात येत आहे. त्यामुळे अमित शहा पुण्यात आले, ना सभा, ना रॅली तरी पोटनिवडणुकीतीबाबत विरोधकांंना धास्ती भरली आहे. अशी चर्चा सध्या पुण्यात चर्चीली जात आहे.
हेही वाचा…“बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं”
दरम्यान, आज पुण्यातील आंबेगाव याठिकाणी शिवसृष्टी लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या उपस्थिती होत आहे. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री व इतर राज्यातील मंत्री देखील उपस्थितीत आहेत. सध्या पुण्यात पोटनिवडणुकांसाठी प्रचार प्रसार सुरू आहे. यातच अमित शहा यांचा पुणे अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..““धनुष्यबाण आणि शिवसेना नाव घेण्यासाठी 2000 कोटींचा सौदा,” शिवसेना खासदाराचा गंभीर दावा
- हेही वाचा..अति आत्मविश्वास राहुल कलाटेंना नडणार का? चिंचवडचे मतदार कुणाच्या बाजूने ?
- हेही वाचा…“राहुल कलाटेंना किती मत पडणार,? रोहित पवारांनी थेट ‘आकडाच’ सांगितला
- हेही वाचा..“गिरीश बापटांच्या भेटीला अमित शहा, कसब्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम होणार?”
- हेही वाचा..साहेबांच्या आदेशानुसार हेमंत रासने जगतापांना मनसेचा पाठिंबा, टिकाकारांना मनसेचं सडेतोड उत्तर