मुंबई: मागच्या आठवड्यांमध्ये पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला तर काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. सलग निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने काँग्रेसमध्ये बंडाची निशाणे फडकू लागली आहेत. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी थेट राहुल गांधी आणि गांधी घराण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. जर नेतृत्वात बदल झाले नाही तर काँग्रेस संपून जाईल असंही बोललं जात आहे. यावर उपाय म्हणून आणि आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची भाजपविरुद्ध एकजूट करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. विरोधकांची आघाडी मजबूत करण्यासाठी युपीएचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडले जाणार आहे.
राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
यावरून भाजपच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आता स्वतःचीच आरती उतरविण्यास सुरुवात केली आहे. मुंडावळ्या बांधून नवरा लग्नासाठी सज्ज झाला आहे. घोड्यावरही बसले आहेत. आता यूपीएचे घटक या नवरदेवाला स्वीकारतील का..? असा खोचक सवाल आमदार अनिल बोंडे यांनी विचारला आहे. युपीएच्या कोणत्याही घटक पक्षांनी शरद पवार यांना आमंत्रण दिले नाही. यांनी स्वतःच उतावीळपणा दाखवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पोरांना हाताशी धरलं आणि स्वतःच्या उपस्थितीत त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि टाळ्याही वाजवल्या असा टोलाही बोंडेंनी पवारांना हाणला आहे.
” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, इतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा अध्यक्ष म्हणून स्वीकार करणार का ? असा सवालही बोंडेंनी उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी, प्रशांत किशोर यांच्या मार्फत फिल्डिंग लावून काहीही करून मला नवरदेव करा, असंच काहीस शरद पवारांच म्हणणंय. काहीही करून ८०व्या वर्षात मला नवरदेव करा, अशी काहीशी स्थिती पवारांची झाली आहे असा खोचक टोलाही बोंडेंनी राष्ट्रवादीला हाणला आहे. आगामी काळात होणाऱ्या देशपातळीवरच्या निवडणुकांसाठी सध्या युपीए अध्यक्षपदाच्या हालचाली वाढलेल्या आहेत. आता खरंच काँग्रेस शरद पवारांना स्वीकारते की काय ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. याचा कितपत फायदा युपीएला होईल याबद्दल तर आगामी काळातील निवडणुकांद्वारेच कळणार आहे.
Read also:
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार