रायगड : मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळला. या दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या आक्रोशाचा टाहो शांत होण्याआधीच आणखी एक दरड कोसळल्याची दुर्घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
तळीये गावात दरड कोसळल्यानं हाहाकार उडाला आहे. तळीयेमध्ये मदत व बचावकार्य सुरू असतानाच महाड तालुक्यात आणखी एक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत मोठी दरड कोसळली आहे. महाडपासून २५ ते ३० किमी अंतरावर हिरकणीवाडी असून, रायगड किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे. आजूबाजूला डोंगर भाग असून, दरड कोसळल्याची घटना घडली.
जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, “हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री”
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तळीयेतील दरड दुरर्घटनेनंतर ही घटना घडल्यानं हिरकणीवाडीत भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर नागरिकांना जवळच्या पाचाड गावात हलवलं जात आहे.
Read Also :
- ‘कर्जत-जामखेडमध्ये फिल्डिंग करणारेही पाहिले अन् मॅच फिक्सिंग करणारेही; रोहित पवारांची फटाकेबाजी
- महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट
- खडसे सोडून गेल्याने भाजपला काही एक फरक पडत नाही! भाजपच्या नेत्याचे मोठे विधान
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’ महाड दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचा कोव्हिड भत्ता रखडला: महापालिकेने मागितली आणखी ७ दिवसांची मुदतवाढ