पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेनुसार, शहर पोलीस दलासाठी ‘हेल्थ 365’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरातील तीन हजारांवर पोलिसांना स्मार्ट वॉचचे वाटप करण्यात आले. चिंचवड येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप झाले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, याचा विचार न करता महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी देखील गुन्हेगारीच्या निमित्ताने चुकीचं वागत असेल तर त्याला कडक शासन करा. मी तुमच्यासोबत आहे, असे म्हणत त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करावी, त्याबाबत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. कोणीही तुम्हाला फोन करणार नाही, कोणाचा फोन आला तर सांगा, मी बघतो त्या फोनवाल्याला, अशी सूचना देखील त्यांनी पोलिसांना केली.
यावेळी त्यांनी चोरांना पाहून पळून गेलेल्या पोलिसांची देखील आठवण करून दिली. पवार म्हणाले की, चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमधून उजेडात आली. चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळलं पाहिजे. उलट चोरांना बघून पोलीस पळतात हे असं करता कामा नये. त्या दोघांवर कारवाई केली. परंतु अश्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते.
Read Also :
- … म्हणून ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी केले बंद
- भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
- मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात ? राज्य सरकारचे संकेत
- धक्कादायक! भंडाऱ्यात सरकारी रुग्णालयात आग लागल्याने 10 बाळांचा मृत्यू
- ‘अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान’