मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेते पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. यातच नांदेड शहारातील राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाचे शहाराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काॅंग्रेस कमिटीचे सदस्य मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे नांदेड शहारात काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…सभागृहात पेन ड्राईव्ह दिला, ‘त्या’ प्रकरणात संपादकांवर गुन्हा दाखल, पण सोमय्यांवर का नाही ?
मंगेश कदम यांच्या पत्नी आणि नांदेडमधील माजी स्थायी समिती सदस्य ज्योती मनिष कदम, एॅड, धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राज्य सरकारने केलेल्या कामाने प्रभावित होऊन तसेच काँग्रेस पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने व्यथित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी कदम यांनी सांगितले. तर शिवसेनेमध्ये त्यांचा उचित सन्मान ठेवला जाईल तसेच त्यांच्या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असे सांगून त्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केले.
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी खूशखबर.., कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत
दरम्यान, त्याच्यासोबतच वांद्रे पूर्व येथील भारत नगर, कला नगर, बिकेसी येथील मुस्लिम बांधव आणि भगिनींनी आज स्थानिक नेते सलिम जफर शेख यांच्या पुढाकाराने शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी सद्दाम अब्दुल सत्तार शेख, मुदशीर सिद्धीकी, शमद शेख, सलाना शेख, रेहाना काशु, आफरिन शेख, अब्दुल कादर यांचा यात समावेश होता. यावेळी काही मुस्लिम महिलांनी माझ्या मनगटावर राखी बांधली. सर्व धर्मांचा सन्मान करणारा पक्ष म्हणजे शिवसेना असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
#नांदेड शहरातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काँग्रेस कमिटीचे सदस्य मंगेश कदम यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्यासह त्यांची… pic.twitter.com/FjVBRn3QyL
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी वातावरण तयार केलं जातंय”, वकील असीम सरोदे यांचा दावा
हेही वाचा…रिक्षा डंपर भरून माझ्याकडे पुरावे, सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं, जरांगे पाटलांचं विधान
हेही वाचा…“चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल, पण जनरल डायरचं काय?” आदित्य ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…काहीही करून मुख्यमंत्र्यांच्या मुलाला घरी बसवायचंय, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना, मोठी रणनीति तयार
हेही वाचा…“जालन्यात मुख्यमंत्र्यांनी उपोषण करायला सांगितले, तर लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिलेत”