मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रांची चाचपणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती स्थापन केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारचं शिष्टमंडळ आमच्या भेटीला येईल ही अपेक्षा आम्ही सोडून दिली असल्याचं उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. यावर आता वकील असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी खूशखबर.., कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का? कारण आरक्षण हा विषय तर राज्य सरकार सोडवू शकत नाही त्यासाठी केंद्र सरकारनेच संविधानिक सुधारणा केली पाहिजे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय झालाय हे दुर्दैव. असं असीम सरोदे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण ? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, एका दिवसात अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आम्ही देतो. सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं. हैदराबादपासूनचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. रिक्षा डंपर भरून पुरावे माझ्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला होता. त्यात कॅबिनेट बैठकही झाली. सरकारचा वेळ वाचवण्यासाठी एका दिवसात पुरावे देऊ. राज्यपालांचा परवानगी घेऊन सरकारने अध्यादेश काढावा. आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठीही तज्ज्ञ देण्याची तयारी असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का? कारण आरक्षण हा विषय तर राज्य सरकार सोडवू शकत नाही त्यासाठी केंद्र सरकारनेच संविधानिक सुधारणा केली पाहिजे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय झालाय हे दुर्दैव.
— Asim Sarode (@AsimSarode) September 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…रिक्षा डंपर भरून माझ्याकडे पुरावे, सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं, जरांगे पाटलांचं विधान
हेही वाचा…“चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल, पण जनरल डायरचं काय?” आदित्य ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…काहीही करून मुख्यमंत्र्यांच्या मुलाला घरी बसवायचंय, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना, मोठी रणनीति तयार
हेही वाचा…“जालन्यात मुख्यमंत्र्यांनी उपोषण करायला सांगितले, तर लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिलेत”
हेही वाचा…सभागृहात पेन ड्राईव्ह दिला, ‘त्या’ प्रकरणात संपादकांवर गुन्हा दाखल, पण सोमय्यांवर का नाही ?