पुणे : गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना दारुड्या काकानेच आपल्या सात वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे चांगल्याच संतापल्या आहे. राज्यात एकाचवेळी तीन -तीन निंदनीय घटना घटतात. मात्र, सरकारचे याकडे लक्ष नाही. एरवी तलवार घेवून बाहेर येणाऱ्या शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे आता कोणत्या कोपऱ्यात जावून बसल्या आहेत?, असा सवाल करत उमा खापरे यांनी संताप व्यक्त केला.
आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
एकाच वेळी नागपूर आणि पनवेलमध्ये तीन -तीन मुलीवर अत्याचार झाले. या सरकारमध्ये नेमके काय चालले आहे?, कोणाचा कोणाला ताळमेळ उरला नाही. ग्रहखात्याचे याकडे सर्रास दुर्लक्ष झाले आहे. गृहमंत्री कुठे आहेत?, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही उरला. काही दिवसांपुर्वी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महिलांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, तेव्हा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे घरातली तलवार घेवून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. आता एकाचवेळी तीन-तीन निंदनीय घटना घडतात. तेव्हा तलवार घेवून बाहेर येणाऱ्या नीलम गोऱ्हे कुठे गायब झाल्या?, असे म्हणत उमा खापरे चांगल्याच संतापल्या.
काय आहे नेमका प्रकार?
महाराष्ट्राच्या उपराजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच समोर आली होती. काही नराधमांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आणि तरुणी गतिमंद असल्याचं हेरत तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेलं. त्या ठिकाणी चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन त्यानंतर तिला ऑटोने मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिजजवळ सोडलं. आरोपी त्यानंतर पळून गेले. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर दोन संशयितांनी तिच्यावर ऑटो रिक्षामध्ये अत्याचार केला आणि ते पण पळून गेले.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा, संजय राठोड यांचा पाय खोलात
पीडित मुलगी त्याच ठिकाणी पडून असल्याचं बघून जवळच असलेल्या रेल्वे पोलिसांना याची माहिती काही नागरिकांनी दिली. रेल्वे पोलिसांनी तिला विचारपूस करत चाइल्डला दिली त्यांनी मुलीला आपल्या सोबत घेऊन गेले आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने माहिती दिली. चाइल्ड लाईनने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांनी चार आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतलं.
Read Also :
- “अजित पवारांसारखा वक्तशीर आणि दिलेल्या शब्दाला पक्का असा दुसरा माणूस नाही”; चंद्रकांत पाटलांचा टोला
- मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
- ५ मुद्द्यांवरून टोला लगावत भाजपने केला सवाल, “शरद पवारांनी केलेलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक नेमकं कशासाठी?”
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भिडले शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते
- “भाजपचा अंतकाळ जवळ, कारण निष्ठवंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय”