मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट पडल्याने राष्ट्रवादीचे काही आमदार द्विधा मनस्थितीत असून या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवार गट प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आता हे आमदार नेमका कुणाला पाठिंबा देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतून दिलं टार्गेट, “लोकसभा निवडणुकीसाठी काहीही करा पण..”
अजित पवार गटाने बैठक घेतली तेव्हा राष्ट्रवादीचे ३१ आमदार बैठकीसाठी उपस्थित होते तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडे १९ आमदार उपस्थित होते. तर काही आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली होती. यातच आता ह्या आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांना आता फोन करण्यात येत आहे. त्यामुळे हे आमदार आता कोणती भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं आहे.
हेही वाचा…“मतदारसंघात जाऊन उत्तर देणार,” रोहित पवारांचा दिलीप वळसे-पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांना अजूनही खातेवाटप करण्यात आलेला नाही. तर अजित पवार काल दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी गेले होते. आज राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सदैव गुलाम म्हणून काम करत राहिन,” शिंदेंचा एक फोन अन् बच्चू कडूंनी निर्णय बदलला
हेही वाचा…“रात्रीचा प्रवास, मुक्काम करा, पण…,” लोकसभेच्या ‘त्या’ १६० भाजपचा मेगा प्लॅन तयार
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवार गटाला अर्थमंत्री अन् मंत्री पद नाही तर ‘या’ कारणामुळे रखडला मंत्रिमंडळाचा विस्तार
हेही वाचा…अब्दुल सत्तारांवर खटला चालणार, ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंची पंचाईत
हेही वाचा…आदिती तटकरेंवर केलेल्या टिकेवर अजित पवार गटाकडून प्रथमच शिंदे गटावर टिका, राजकारण तापलं