मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भआजप महायुतीचं पहिलचं पावसाळी अधिवेशन येत्या तीन ते चार दिवसापासून सुरू होत आहे. परंतु एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप रखडला असून मंत्रिमंडळाचा तिढा आता सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीहून आल्यानंतर आता राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
हेही वाचा…गोगवालेंना ‘ते’ वाक्य भोवलं, रोहित पवारांसह आख्खी राष्ट्रवादी आदिती तटकरेंच्या पाठिंशी
अजित पवार यांच्या दिल्लीवारीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होत आहे. अजित पवार गटाला अर्थ, उर्जा आणि जलसंपदा खात्याची आणि पुणे पालकमंत्री पदाची मागणी केली होती. त्यामुळे मंत्रिमंडळाचा तोडगा आज सुटणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार असून पावसाळी अधिवेशन आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे. सगळ्याच पक्षातील नेते विस्ताराकडे लक्ष लावून बसले आहेत. यावेळी पण आमदारांच्या पदरी नाराजी असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.
हेही वाचा…“ .त्यावेळी मी मृत्यूची वाट पाहत होते…,” निलम गोऱ्हे हुंदका देत व्यक्त झाल्या
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूट पाडून सरकारमध्ये मंत्रिपद मिळवलेल्यांना खातेवाटप करताना शिवसेना तसेच भाजपच्या इच्छुकांचाही मंत्रिमंडळात समावेश करून एकत्रित खातेवाटप करण्याबाबत भाजपचे दिल्लीतील शीर्षस्थ नेते गांभीर्याने विचार करीत असल्यानेच या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे समजते. विविध खात्यांना कोण कसे न्याय देऊ शकते?, यावरूनही खल सुरू असल्याचे समजते. विशेष म्हणजे खातेवाटपापेक्षाही मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पक्षांतर्गत धुसफूस होऊ नये, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधात प्रतिमा तयार करण्याची संधी विरोधकांना मिळू नये यादृष्टीने नवा डाव टाकण्याची रणनीती केंद्रातील नेत्यांकडून आखली जात असल्याचे समजते.
READ ALSO :
हेही वाचा…अब्दुल सत्तारांवर खटला चालणार, ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंची पंचाईत
हेही वाचा…आदिती तटकरेंवर केलेल्या टिकेवर अजित पवार गटाकडून प्रथमच शिंदे गटावर टिका, राजकारण तापलं
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतून दिलं टार्गेट, “लोकसभा निवडणुकीसाठी काहीही करा पण..”
हेही वाचा…“मतदारसंघात जाऊन उत्तर देणार,” रोहित पवारांचा दिलीप वळसे-पाटलांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मंत्रिमंडळाचा तिढा दिल्ली दरबारी, अजित पवार अमित शहांच्या भेटीला, शिंदे-फडणवीसही जाणार